News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

विद्या प्रतिष्ठान मध्ये जागतिक दृष्टी दिन साजरा

विद्या प्रतिष्ठान मध्ये जागतिक दृष्टी दिन साजरा



बारामती: प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठानचे कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालय, बारामती येथे १० जून २०२६ रोजी जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना व रेड रेबीन क्लब(आरआरसी) ग्रामीण रुग्णालय, रुई, बारामती यांच्या वतीने नेत्रदान जनजागृती व नेत्र तपासणी शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नेत्रचिकित्सा अधिकारी (Ophthalmic Officer) डॉ. नेहा कैलास तिळेकर व प्रयोगशाळा तंत्रज्ञ नम्रता येले यांनी मार्गदर्शन केले. पाहुण्यांचा सत्कार महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुमन देवरुमठ यांनी केला. नेत्रचिकित्सा अधिकारी (Ophthalmic Officer) डॉ. नेहा कैलास तिळेकर यांनी २७ विद्यार्थी, १२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या डोळ्यांची तपासणी ग्रामीण रुग्णालय, रुई, येथे केली. तसेच त्यांनी डोळ्यांची काळजी, नेत्रदानाचे महत्व व गरज यावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कु.ऋतुजा डोंगरे हिने केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुमन देवरुमठ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment