News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

व्हीपीकेबीआयईटीची प्लेसमेंटमध्ये भरारी.३७५ हून अधिक विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकरीसाठी निवड

व्हीपीकेबीआयईटीची प्लेसमेंटमध्ये भरारी.३७५ हून अधिक विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकरीसाठी निवड


बारामती: प्रतिनिधी
 विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थेतील विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत यंदा ३७५ हून अधिक प्लेसमेंट्स मिळविल्या आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांच्या गौरवार्थ आयोजित सत्कार समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी झोरिएंट टेक्नॉलॉजीजचे मुख्य संचालन अधिकारी (सी.ओ.ओ.) आणि माजी विद्यार्थी श्री. शिवराज साबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून आणि मान्यवर अतिथी म्हणून सौ. स्वप्ना साबळे (व्हाईस प्रेसिडेंट, सिटी बँक) आणि माजी विद्यार्थी यांची विशेष उपस्थिती लाभली. डॉ. पी. आर. चित्रगार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व पाहुण्यांचा शैक्षणिक, व्यावसायिक तसेच औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील अपेक्षा, तांत्रिक कौशल्यांचे वाढते महत्त्व, तसेच करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक गुणांविषयी मार्गदर्शन केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात सतत शिकण्याची वृत्ती, नाविन्यपूर्ण विचारसरणी आणि संवादकौशल्ये विकसित करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.. बदलत्या तंत्रज्ञानासोबत सातत्याने स्वतःला अद्ययावत ठेवण्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमास या कार्यक्रमात ज्योती कुलकर्णी यांनी वर्षभरात झालेल्या ट्रेनिंग प्रोग्रॅम्स आणि प्लेसमेंट्स विषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

संस्थेच्या प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, तांत्रिक कौशल्यवृद्धी तसेच मुलाखत तयारीचे विशेष मार्गदर्शन देण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांची निवड टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस), कॉग्निझंट, कॅपजेमिनी, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टीई कनेकक्टिव्हिटी, भारत फोर्ज, नेलसॉफ्ट, आदिसॉफ्ट टेक्नॉलॉजीज, जेबी एव्हरेस्ट, लक्ष्मी कन्स्ट्रक्शन, भारत बिजली आदी प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये झाली. विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांची मेहनत, पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे व डिपार्टमेंट कोऑर्डिनेटर्सचे गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन यांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे डॉ. विशाल कोरे यांनी सांगितले. प्राचार्य सुधीर लांडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे संशोधन निबंधांच्या सर्वाधिक प्रकाशनासाठी तसेच GATE परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

यंदाच्या प्लेसमेंट हंगामात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदविली असून विद्यार्थी प्रज्वल शिंदे याने वार्षिक १२ लाख रुपयांच्या (12 LPA) सर्वोच्च पॅकेजसह संस्थेचा मान उंचावला आहे. तसेच १५ हून अधिक विद्यार्थ्यांना ७.५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक वार्षिक वेतनाचे पॅकेज प्राप्त झाले आहे.

विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मा. अॕड. अशोक प्रभुणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शैक्षणिक गुणवत्ता, नैतिक मूल्ये आणि उद्योगक्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रानिया सनदी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. ज्योती कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापकांचे आभार मानले.

संस्थेच्या सर्व विश्वस्तांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले, तसेच विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये मिळालेल्या रोजगाराच्या संधींबद्दल समाधान व्यक्त केले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment