News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

विद्या प्रतिष्ठान मध्ये 'एआय तंत्रज्ञान' कार्यशाळा संपन्न

विद्या प्रतिष्ठान मध्ये 'एआय तंत्रज्ञान' कार्यशाळा संपन्न



बारामती:प्रतिनिधी 
  विद्या प्रतिष्ठानचे कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाने शिक्षकांसाठी दोन दिवसीय राज्यस्तरीय कृत्रिम बुद्धिमत्ता साधने व प्रत्यक्ष तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे आयोजन विद्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स येथे करण्यात आले होते.
शिक्षण क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, अध्यापन अधिक प्रभावी व नाविन्यपूर्ण व्हावे आणि AI आधारित विविध साधनांचा प्रत्यक्ष वापर करता यावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
या कार्यक्रमाच्या उद्घाटन डॉ. पवन कुलवाल ( वरिष्ठ कापूस संकरक व प्राध्यापक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ,) यांनी केले.
 कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? त्याचे शिक्षण क्षेत्रातील महत्व, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये AI चा वापर कुठे, कोणत्या कामासाठी आणि किती प्रमाणात करावा याबद्दल मार्गदर्शन केले.
 या कार्यक्रमासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. योगेश फाटके, सहाय्यक प्राध्यापक, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, शारदानगर होते 
 त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास जसे की कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग यांच्या मदतीने ऊस शेतीमध्ये मोठे बदल घडवून आणता येतात जसे की उत्पादन वाढ, कमी खर्चिक, पाण्याची बचत आणि पर्यावरण संरक्षण शक्य होते. भविष्यात स्मार्ट शेती ही ऊस शेतीच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे या विषयी मार्गदर्शन केले. 
तसेच डॉ. आर. एन. सिंग – वैज्ञानिक आयसीएआर नियाजम, माळेगाव यांनी कृषी क्षेत्रामध्ये पिकांच्या उत्पादनावर अनेक प्रकारचे ताण जैविक आणि अजैविक यांचा परिणाम होतो. हे ताण कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग यांच्या मदतीने अचूक व्यवस्थापन करून उत्पादन वाढ करण्यासाठी शक्य होते या विषयी मार्गदर्शन केले. डॉ. प्रदीप पैठणे सहयोगी प्राध्यापक, आयटी विभाग आणि डॉ. विपिन गावंडे सहाय्यक प्राध्यापक व्हीपीकेबीआयईटी, बारामती यांनी प्रशिक्षणामध्ये सहभागी शिक्षक व संशोधकांना AI साधनांचा प्रत्यक्ष वापर शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता सुधारण्यासाठी, मॉडेल, प्रकल्प तयार करणे, वैज्ञानिक लेख, संशोधन पेपर, विज्ञान विषयांचे प्रायोगिक सिम्युलेशन्स करणे आदी विषयी मार्गदर्शन केले.
विद्या प्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त तसेच व्यवस्थापन कमिटी, प्राचार्य डॉ. सुधीर लांडे व्हीपीकेबीआयईटी, एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट केवीके माळेगाव, डॉ. विशाल कोरे, डॉ. संगीता गायकवाड, वरिष्ठ संशोधक, व्हीएसआय डॉ. आर एम देवरुमठ यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी विविध प्रायोजकांनी सहकार्य केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुमन देवरुमठ यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले 
 फोटो ओळ: एआय तंत्रज्ञान वर आधारित कार्यशाळा प्रसंगी मान्यवर

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment