News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

बारामतीच्या औद्योगिक विकासाला गती

बारामतीच्या औद्योगिक विकासाला गती



उपमुख्यमंत्री पवार : बारामतीत गेटझनरच्या प्रकल्पाचे उद्घाटन

बारामती, दि. १३ (प्रतिनिधी) - गेटद्वानर इंडिया प्रा. लि.च्या उत्पादन प्रकल्पामुळे राज्याच्या औद्योगिक धोरणावर आणि गुंतवणूकस्नेही वातावरणावर जागतिक स्तरावरील विश्वास अधिक बळकट होत असल्याचे दिसून येते. या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून उद्योजकांनाही नवे संधी मिळतील. त्यामुळे बारामतीच्या औद्योगिक विकासाला निश्चितच गती मिळोत, असा विश्वास उगमुख्यमंत्री सुनेत्राअजित पवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र औद्योगिक विकासमहामंडळाच्या परिसरात गेट्झनर इंडियाच्या उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ऑस्ट्रियाचे राजदूत रॉबर्ट झीग, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, नगराध्यक्ष सचिन सातव, एममापडीचे कार्यकारी अभियंता विजय पेठकर, बारामती औद्योगिक घसाहत संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार, गेटशनर ऑस्ट्रियाचे
मुख्य कार्यकारी अधिकारी चुर्गेन राईनआल्टर, माजी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. उज्वल उके, इसीजी फेडरेशनचे चेअरमन स्मणसिंग सिधू, गेटझनरचे निवासी संचालक संजय रिसबुड, राष्ट्रवादी उद्योग व्यापार सेल चे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण जगताप,राज्य उपाध्यक्ष राजाराम सातपुते उपस्थित होते.
 पवार म्हणाल्या की, प्रस्त्यामध्ये अद्ययावत पोयू मोल्डिंग, दुष्यम प्रक्रिया सुविधा उपलब्ध आहेत. उत्पादित होणारी उत्पादने विशेषतः मेट्रो प्रकल्पांसाठी वापरणार आहेत. ही उत्पादने आयात पर्यायी असल्याने परकीय चलनाचीही बचत होणार आहे. येथून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादने विकसित होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बारामती हो भूयो असली, तरी आता ती आधुनिक उद्योगनगरी म्हणूनही उदयास येत आहे. परिणामी राज्याच्या आर्थिक विकासालाही

गती मिळेल. उद्योगांचा विकास होत असताना पर्यावरणाचा जास होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. यावेळी प्रकल्प उभारणीच्या कार्यात योगदान दिल्याबदल नगरपरिषदेचे अध्यक्ष सचिन सातष आणि एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले. आभार प्रकल्प प्रमुख हरीश ढोले यांनी मानले.

चौकट: 

परकीय गुंतवणूकदार उत्सुक.....
ऑस्ट्रियाचे राजदूत रॉबर्ट झीग म्हणाले की, भारतामध्ये उद्योगस्नेही व गुंतवणूकपूरक वातावरण उपलब्ध असल्यामुळे अधिकाधिक परकीय गुंतवणूकदार येथे प्रकल्प उभारण्यास उत्सुक आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून दर्जेदार उत्पादनाबरोबरच स्थानिकांना रोजगार देण्याला प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रकल्पाची पाहणी करून उत्पादनाबाबत माहिती घेतली.

फोटो ओळ: 
गेझनार कंपनीचे उदघाटन करताना सुनेत्रा पवार,डॉ रॉबर्ट ,संजय रिसबुड व इतर

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment