News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पाककला स्पर्धेत अनुराधा नाळे विजेत्या

पाककला स्पर्धेत अनुराधा नाळे विजेत्या


जिजाऊ सेवा संघाच्या पाक कला साठी महिलांचा प्रतिसाद 

बारामती:
नवरात्र उत्सवा निमित्त बारामती तालुका मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ सेवा संघ यांच्या वतीने 'महिलांसाठी उपवासाची पाककला' स्पर्धेचे आयोजन बुधवार दि.२४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेत उपवासाचे इडली सांबर हा पदार्थ तयार करणाऱ्या अनुराधा नाळे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
या प्रसंगी मराठा सेवा संघाच्या विश्वस्त जयश्री सातव, छाया कदम व विजया कदम, बारामती बँक संचालिका कल्पना शिंदे,मराठा महासंघ अध्यक्षा अर्चना सातव व राजश्री भोसले, व्हेरिटास इंजिनिअरिंगच्या संचालिका नीलम भापकर ,उत्कर्ष डेव्हलपर्स च्या राजेश्वरी जगताप ,ओम साई लॉन्स च्या वनीता तावरे,भगिनी मंडळाच्या विश्वस्त सुनिता शहा, सीमा चव्हाण, अंजली संगई,परीक्षक लीना बालगुडे, नाजनिन तांबोळी व जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा स्वाती ढवाण व मनीषा शिंदे, सुनंदा जगताप, कल्पना माने, सारिका मोरे, मनीषा खेडेकर, ऋतुजा नलावडे, गौरी पाटील, वंदना जाधव, सुवर्णा केसकर, विद्या निंबाळकर,पूजा खलाटे, भारती शेळके,संगीता साळुंखे,अमृता सूर्यवंशी व कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्सचे अनिकेत पोळके व निखिल खरात आणि 
इतर मान्यवर महिला उपस्तीत होत्या.
उपवासाचे तिखट पदार्थ मधील विजेत्या 
 प्रथम क्रमांक- अनुराधा नाळे,
 उपवासाचे इडली सांबर , द्वितीय क्रमांक - विद्या कुंभार पॅटीस, तृतीय क्रमांक- विनिता नरवणीकर उपवासाचा सामोसा,
 उत्तेजनार्थ - प्राजक्ता जगताप
उपवासाचे गोड पदार्थ
 प्रथम क्रमांक- मोनिका आगवणे
 मखाना मावा पोळी, द्वितीय क्रमांक स्वरांजली झिरपे ड्राय फ्रुट्स रोल,
 तृतीय क्रमांक- पूजा भोसले मोदक 
 उत्तेजनार्थ - अफसाना शेख 
 मखाना खीर 
 उत्तेजनार्थ- प्रतिभा भोजे - बिस्किट
आदिना सन्मानित करण्यात आले.
नोकरी , व्यवसाय व गृहणी म्हणून काम करत असताना महिलांना नवनवीन पदार्थ तयार यावेत,शरीराला जे उत्कृष्ट आहे ते कुटूंबाला मिळावे म्हणून स्त्रीची भूमिका प्रमुख असल्याने पाककला महत्वाची असल्याने स्वयंपाक घराला उजाळा देण्यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन केल्याचे अध्यक्षा स्वाती ढवाण यांनी सांगितले.
सूत्रसंचालन भारती शेळके यांनी केले तर आभार मनीषा शिंदे यांनी मानले 

फोटो ओळ: 
पाककला स्पर्धेतील विजेत्या व मान्यवर महिला

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment