बारामती च्या वैभवात भर घालणारी'दुर्गादेवी'
बारामती: प्रतिनिधी
बारामती शहरातील मध्यवर्ती भिगवण चौकात बारामती तालुक्या मधील एकमेव दुर्गा देवी मंदिर असून बारामती च्या वैभवात व आनंदात भर घालणारी देवी म्हणून सुद्धा प्राचीन काळा पासून उल्लेख केला जातो. या परिसरात प्राचीन काळा पासून दुर्गा देवी मंदिर प्रसिद्ध असून त्या पूर्वी याच ठिकाणी लिंबवृक्षा खाली छोटेसे देवीचे मंदिर होते १९४२ मध्ये मंदिराचे काम करण्यात आले त्याच्या शेजारी माता अन्नपूर्णा व माता सरस्वती देवीचे छोटे मंदिर व समोरील बाजूस होम कुंड व वाहन म्हणून सिंहा ची मूर्ती बांधण्यात आली आहे.
मंदिराच्या आतील भिंतीवर शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा,,कुशमांडा, स्कंदमाता ,कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री आदी देवीच्या विविध रूपाची माहिती भाविकांसाठी लिहून लिहली आहे.
नवरात्र उत्सव मध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात रोज रात्री १० वाजता सामूहिक आरती झाल्यानंतर खास गरबा व रास दांडिया चे आयोजन केले जाते.या मध्ये महिला व पुरुष सहभागी होतात बालका पासून ते ज्येष्ठा पर्यंत सर्वांचा सहभाग असतो अष्टमीला होम हवन केले जाते. कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा विविध कार्यक्रम ट्रस्ट मार्फत आयोजित करण्यात येतात.मध्यवर्ती ठिकाणी भिगवण चौकात देवीचे मंदिर असून छोट्याशा मंदिराचे बांधकाम झाल्यापासून या परिसरात प्रत्येकाच्या घरात आर्थिक संपन्नता येऊ लागली आहे म्हणून वैभव प्राप्त करून देणारी व आनंद देणारी दुर्गा देवी असा सुद्धा उल्लेख आहे
सद्या श्री शक्ति सेवा गुजराथी मंडळ ट्रस्ट मंदिराचे कामकाज पाहत आहे. अध्यक्ष मेहुल गुजर, उपाध्यक्ष हरेश गुजराथी, खजिनदार विनोद रावळ, कार्याध्यक्ष वसंत ठाकर , विश्वस्त निरज देसाई,विपुल दवे, हार्दिक गुजराथी, जितेंद्र रावळ, विपुल गुजराथी व इतर सहकारी काम पहात आहेत. अशी माहिती ट्रस्टी विजय जोशी यांनी दिली एकमेव दुर्गा देवी मंदिर असल्याने नवरात्र उत्सव मध्ये दर्शनासाठी विविध भागातून भाविक दर्शनासाठी येत असतात .
फोटो ओळ:
भिगवण चौक येथील दुर्गा देवी ची आकर्षक मूर्ती ( छाया अनिल सावळेपाटील)
Post a Comment