देशभक्तीच्या वातावरणात अजितदादा शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा
बारामती:प्रतिनिधी
कटफळ येथील अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. देशभक्तीपर गीते, घोषणाबाजी, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि विद्यार्थ्यांच्या वेशभूषा यामुळे शाळेचे वातावरण देशभक्तीने भारावून गेले होते.
ध्वजारोहण प्रमुख ॲड. गुलाबराव गावडे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते झाले. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले. इयत्ता सहावी-सातवीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक संचलन तर नववी-दहावीतील विद्यार्थिनींनी जोशपूर्ण लेझीम सादर केली. लहानग्यांपासून बारावीपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. गुणवंत व गौरवशाली विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या प्रसंगी ॲड. गुलाबराव गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष नानासाहेब मोकाशी, अध्यक्ष संग्रामसिंह मोकाशी व सचिव संगीताताई मोकाशी, सदस्या श्रद्धाताई मोकाशी, चंद्रभागा कॉलेज ऑफ फार्मसी चे प्रिन्सिपल डॉ.विनोद पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे श्रेया सिंग आणि भावना माळी यांनी वर्गशिक्षक पंकज खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. मुख्याध्यापक प्रशांत वणवे यांनी आभार व्यक्त केले.
फोटो ओळ: अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूल येथे स्वातंत्र्य दिन साजरा करताना मान्यवर
Post a Comment