वंजारवाडी मध्ये ध्वजारोहण चा मान ज्येष्ठ महिला व सेवानिवृत्त पोलीस यांना
बारामती: प्रतिनिधी
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजा रोहनचा मान वंजारवाडी चे सरपंच जगन्नाथ वणवे यांनी गावातील वृद्ध ज्येष्ठ महिलांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
श्रीमती यमुनाबाई ज्ञानदेव आव्हाड, श्रीमती छबुबाई देवबा चौधर, श्रीमती वैशाली नवनाथ चौधर व श्रीमती सईबाई चौधर यांनी झेंडा वंदन केले.
मुबंई येथील सेवा निवृत्त पोलीस निरिक्षक भगवान चौधर यांच्या हस्ते
अंगणवाडी शाळेतील ध्वजारोहण करून त्याच्या कार्याचा मान देण्यात आला.
या प्रसंगी उपसरपंच चिन्मयनंदा नितीन चौधर, सदस्य गोरख चौधर सागर दराडे, बाळासाहेब ठोकळे, ग्रामसेवक निलेश लवटे पोलीस पाटील पोपट चौधर व नितीन चौधर, शरद चौधर, महेश चौधर,संतोष चौधर,अशोकराव सूर्यवंशी, गोवर्धन गवारे व जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा भालेराव व शिक्षक,विद्यार्थी उपस्तीत होते.
ज्येष्ठ महिला, विधवा, परितक्त्या यांना सन्मामाचे स्थान मिळावे हा संदेश सर्वदूर जावा व स्वतंत्र दिनी महिलांचा सन्मान होणे साठी झेंडा वंदन ज्येष्ठ महिलांच्या हस्ते करून सामाजिक परिवर्तन चा संदेश देत असल्याचे सरपंच जगन्नाथ वणवे यांनी सांगितले.
फोटो ओळ:
वंजारवाडी मध्ये ज्येष्ठ महिलांचे हस्ते झेंडावंदन प्रसंगी सरपंच जगन्नाथ वणवे
---------------
Post a Comment