झैनबिया स्कूलच्या विद्यार्थ्यांचे फुटबॉल व तायक्वांदो स्पर्धेत यश
बारामती:प्रतिनिधी
कटफळ येथील अब्बास मोहम्मद हुसेन एज्युकेशन ट्रस्ट संचलित झैनबिया स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बारामती तालुकास्तरीय फुटबॉल व तायक्वांदो स्पर्धेत यश मिळविले असून त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने फुटबॉल स्पर्धा तालुका क्रीडा संकुल माळेगाव येथे संपन्न झाल्या.
स्पर्धेचे उद्घाटन अध्यक्ष बारामती तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे राजेंद्र खोमणे , तायक्वांदो असोसिएशन ऑफ बारामतीच्या सचिव पूनम जाधव व प्रशिक्षक, शिक्षक,पालक आयोजक शिक्षकांच्या हस्ते पार पडले.
फुटबॉल या खेळात १७ वर्षे वयोगटात मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवून त्यांची पुलगाव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली. त्यामध्ये श्रेयशी गायकवाड, अनुप्रिया नाझीरकर, मुग्धा धोंडे, अमिशा पटेल, अनम मुश्रीफ, मारिया हुसेनी, हर्षाली पालीवाल, जैनब हकीमजीवाला, गौरी गावडे, इकरा सय्यद, आदिती गावडे, अन्नू जादौन, कुलसुम खान, अक्षरा सूर्यवंशी, सदाफ देशमुख, सिद्धी काळे, विद्या देवासी, संस्कृती बनकर या विद्यार्थिनीची निवड झालेली आहे.
तसेच तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात मुलींमध्ये मधुरा भोसले, प्रियल ढाणे, धनश्री खंडागळे, आरोही परकाळे यांनी यश मिळवले व १७ वर्षे वयोगटात आर्या शिंदे या विद्यार्थिनींनी यश मिळवले व मुलांमध्ये शिवराज कालगावकर, पियुष मोकाशी, अभिषेक मोकाशी या विद्यार्थ्यांनी यश मिळवले तसेच अनुष्का झगडे, प्रेरणा मोकाशी, आर्या पाटोळे, सांगवी मदने, भक्ती शिंदे, श्रेया चव्हाण, अनन्या ढाणे, राजंन खराडे, कार्तिक मासनवार, ईशान कालगावकर, प्रसाद झगडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
शाळेच्या प्राचार्या इन्सिया नासिकवाला यांनी सर्व मार्गदर्शक क्रीडाशिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो ओळ: जेनेबिया स्कूलचे यशस्वी विद्यार्थी व प्रशिक्षक
Post a Comment