गुणवतांचा आदर्श युवकांनी घ्यावा :राहुल चौधर
वंजारवाडी मध्ये विविध क्षेत्रातील यशवंतांचा सन्मान
बारामती:प्रतिनिधी
गुणवंतांचा सन्मान होणे ही काळाची गरज असून गुणवंत व यशस्वी झालेल्या यशवंताचा आदर्श युवा पिढीने घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक राहुल चौधर यांनी केले.
वंजारवाडी येथे राहुल चौधर मित्र परिवार यांच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी राहुल चौधर मार्गदर्शन करत होते.
या प्रसंगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये आयपीएस साठी निवड झालेले अभिजीत चौधर व पुष्कर घोळवे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग च्या परीक्षा मधून महसूल सहाय्यक पदी निवड झालेले अमर चौधर, मोहिनी चौधर, सायली होले, सुनिता हंगे पानसरे, सायली वीरकर, विशाल पवार व वैदकीय क्षेत्रात एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झालेले डॉ. प्रेरणा चौधर, डॉ. अजय खाडे, डॉ.प्रीती मालुसरे (पीएचडी) ,आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या प्रशिक्षक पदी निवड झाल्याबद्दल दादासो आव्हाड ,पिंच्याक सीलाट खेळात सुवर्णपदक विजेत्या श्रेया गर्जे महाराष्ट्र कुस्ती संघात निवड झालेले अभिमन्यू चौधर,आयटी क्षेत्रात निवड झालेले निलेश चौधर, तेजस चौधर बेंगलोर,आदर्श सरपंच जगन्नाथ वनवे,सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भगवान चौधर,भारतीय आर्मी मधून सेवा निवृत्त झालेले दत्तात्रेय झगडे,सी.आर. पी. एफ. सेवा निवृत्त मार्शल पांडुरंग झगडे, आदर्श ग्राम अधिकारी निलेश लव्हटे यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सतीश चौधर ,तुकाराम चौधर,संतोष चौधर, लखन चौधर, रघुनाथ चौधर व रोहित वनवे आदी मान्यवर उपस्तीत होते.
मोबाईल कामा पुरता वापरा, व्यसन होऊ देऊ नका,लक्ष्य पूर्ण करण्यासाठी अभ्यास चिकाटीने करणे गरजेचे असल्याचे यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
तुकाराम चौधर यांनी आभार मानले
फोटो ओळ: विविध क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थी व मान्यवर
--------------------------------
Post a Comment