अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर “सेव्हेन स्टार आयकॉन “ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद
१६ मजले प्रथमच होत असल्याने गुणवत्ता व दर्जा पाहून ग्राहक समाधानी
बारामती:प्रतिनिधी
बारामती विद्या प्रतिष्ठान नजीक असलेल्या समर्थ आयकॉन प्रोजेक्टचे “सेव्हन स्टार आयकॉन “या गृह व व्यवसायिक प्रकल्पास बारामती सह इतर जिल्हा व तालुक्यातील ग्राहकांचा अक्षय तृतीया च्या शुभमुहूर्तावर बुकिंग साठी प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे .
कामाचा चढता आलेख हा ग्राहकांचे पहिले समाधान करणारा असतो, कामाचा दर्जा राखून “समर्थ आयकॉन” ने बारामती मधील सर्वात उंच इमारत “सेव्हन स्टार आयकॉन” या बिल्डिंगच्या पहिल्या स्लॅबचा बुधवार दि.२९ एप्रिल रोजी शुभारंभ केला.उद्योजक कपिल शर्मा या ग्राहकाच्या हस्ते पहिल्या पार्किंग स्लॅबचे पूजन करून शुभारंभ करण्यात आला .
या वेळी समर्थ आयकॉन प्रोजेक्टचे संचालक ऍड हरीश कुंभारकर ,दादासाहेब चौधर, भारत मोकाशी,मेजर अनिल कायगुडे, गणेश मोरे, संतोष दिवेकर, उदयसिंह मोरे पाटील व इतर ग्राहक उपस्तीत होते.सदर प्रकल्पात दोन, तीन व चार बीएचके २०१ फ्लॅटस् असून शॉप्स व ॲाफीस एकुण २१५ आहेत .उ
छोट्या व्यवसायिक पासून ते मोठ्या व्यवसायिक ला लागणारे क्षेत्रफळ उपलब्ध होणार आहे .
विद्या प्रतिष्ठान नजीक ,पेन्सिल चौक व औद्योगिक वसाहत शेजारी सदर प्रकल्प असल्याने सर्व शासनाच्या सर्व नियम व अटी चे पालन करून सदर प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे.
बारामती तालुक्यातील २ मजले बेसमेंट पार्किंग व १६ मजली इमारत मध्ये राहण्याचा व व्यवसाय करण्याचा आनंद वेगळाच असणार असून नियोजीत वेळेत ताबा मिळणार आहे.सर्व नामांकित कंपन्यांचे साहित्य वापरून , अद्यावत तंत्रज्ञान, बांधकामाचा गुणवत्ता व दर्जा ग्राहकांना दिला जाणार आहे.त्यामुळे बारामती सह पुणे , सोलापूर , सातारा जिल्हा अधिक परिसरातील अनेक ग्राहकांनी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकिंग साठी गर्दी केली होती.
सर्वसामान्य कुटुंबाचे स्वप्नातील घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार असून १६ मजली इमारत मध्ये राहण्याचा आनंद मिळणार असल्याने प्रोजेक्ट च्या कार्यालयाच्या पहिल्या भेटीत बुकिंग केले आहे .
श्री व सौ. गणेश चौधरी
बुकिंग करणारे ग्राहक यांनी सांगितले
मुंबई वरून बारामतीला शिक्षण व उद्योग व्यवसायासाठी आलो पुण्यानंतर बारामती मध्ये राहण्यासाठी पसंदी दिली
बांधकाम पाहताना उच्च दर्जाची गुणवत्ता व दर्जा पाहून बुकिंग केले
श्री व सौ . कपिल शर्मा
उद्योजक यांनी सांगितले
फोटो ओळ:
सेव्हन स्टार आयकॉन च्या प्रोजेक्ट ची माहिती घेताना ग्राहक
----------------------------------------
Post a Comment