झैनबिया स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा
बारामती:प्रतिनिधी
कटफळ(बारामती)अब्बास मोहम्मद हुसेन एज्युकेशन ट्रस्ट संचलित झैनबिया इंग्लिश मिडीयम स्कूल कटफळमध्ये १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेले शाळेच्या मुख्याध्यापिका,उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक इत्यादी उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका इन्सिया नाशिकवाला व उपमुख्याध्यापिका आयशा पठाण व जाकीर सय्यद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत, झेंडागीत व महाराष्ट्रगीत ही सर्व गीते सादर करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना राहुल लंबाते यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिन याविषयी माहिती सांगितली.
फोटो ओळ :
महाराष्ट्र दिन साजरा करत असताना मान्यवर
Post a Comment