News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

बारामतीमध्ये शरयु चषक २०२५ ही कराटे लीग संपन्न

बारामतीमध्ये शरयु चषक २०२५ ही कराटे लीग संपन्न



राज्यातील सर्वात मोठी कराटे स्पर्धा 


बारामती-
 विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्रदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शरयु चषक या राज्यातील सर्वात मोठ्या कराटे लीगचे आयोजन शनिवार दिनांक २६ व रविवार दिनांक २७ एप्रिल रोजी बारामती मध्ये आयोजन करण्यात आले होते. शरयु फौंडशन व बारामती कराटे असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते . 
राज्यातील ८१७ खेळाडूंनी सहभाग घेतला.
 या स्पर्धेचे उदघाटन शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या शुभहस्ते झाले यावेळी तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, शिव छत्रपती पुरस्कार विजेती रेखा धनगर,समीर वर्ल्ड स्कूलचे डायरेक्टर साहजेब सय्यद,अनेकांत 
एज्युकेशन सोसायटीचे धवल शहा,अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रिन्सिपल शितल वायाळ, बाळकृष्ण करळे आदी उपस्तीत होते.

तसेच शरयु फौंडेशनचे सर्व सदस्यच्या उपस्थितीमध्ये पार पडला बक्षीस वितरण विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मा.अँड. श्री. ए. व्ही. प्रभुणे यांच्या हस्ते करण्यात आले 
 स्पर्धेतील सहभागी विजेत्याना 
 २५ बेस्ट खेळाडूंना २१ गिअर २५ स्पोर्ट्स सायकल, १८ वर्षा वरील खेळाडूंना विविध वैयक्तिक गटामध्ये रोख तसेच सांघिकमध्ये प्रथम क्रमांकाचे चषक सांघिक पारितोषिक पिंपरी चिंचवडच्या विश्वा स्पोर्ट्स अकॅडमी या संघाला तर दुसऱ्या क्रमांकाचे चषक सांघिक पारितोषिक कोल्हापूरच्या कोल्हापूर वस्ताद संघाला , तृतीय क्रमांकाचे व चषक सांघिक पारितोषिक चंद्रपूरच्या फिट टू फाईट या संघाला देण्यात आले.
शरयु चषक महाराष्ट्र कराटे लीग स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बारामती कराटे असोसिएशनचे प्रमुख प्रशिक्षक रविंद्र करळे याच्यासह अभिमन्यू इंगुले,शिवाजी भिसे,राजन शिंदे,तेजस कांबळे,अनुराग देशमुख, राहुल सोनवणे,मुकेश कांबळे,अमोली पानारी-गायकवाड ,आयेशा शेख, सुमेध कांबळे, आयात शेख, विक्रांत काळे,ऋषिकेश मोरे, हर्ष भोसले,जय साबळे, तेजस्विनी जगताप , फरजाना पठाण,सिद्धी करळे, श्रुती करळे,आयुष करळे,श्रुतिका माड्डचेट्टी,सिद्धी बोरा इत्यादी सर्व बारामती कराटे असोसिएशन व शरयु फौंडशनच्या सदस्य यांनी परिश्रम घेतले.
प्रस्तावना रविंद्र करळे यांनी केली व आभार प्रदर्शन अभिमन्यू इंगुले यांनी केले.

फोटो ओळ: 
विजेत्या खेळाडूंचा सन्मान करताना मान्यवर

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment