कमलनयन बजाज ची वार्षिक पालक सभा संपन्न
बारामती:
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची पालकसभा १२ एप्रिल रोजी संपन्न झाली. पालकांचे प्रतिनिधी म्हणून लाभलेले अमोल निंबाळकर व महिला पालक प्रतिनिधी लता बाबर यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे व अन्य मान्यवर यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. प्रथम सत्रामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळविले अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य व व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे शैक्षणिक अधिष्ठता डॉ. सचिन भोसले, महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. सुरज कुंभार तसेच प्रथम वर्ष अभियांत्रिकी शाखेचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनिल डिसले या सर्व विभाग प्रमुखांनी प्रथम सत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी जे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा विषयी तसेच प्लेसमेंट करिता जे उपक्रम राबविले गेले व त्यामध्ये विद्यार्थ्यांनी जो सक्रिय सहभाग घेतला याची इत्थंभूत माहिती दिली.
आपल्या पाल्याच्या सर्वागीण विकासासाठी महाविद्यालय कोणकोणते उपक्रम राबविते याची कल्पना पालकवर्गाला असावी या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रा लांडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गौरी भोईटे व प्रा. दीपक सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्याशाखांचे सर्व विभाग प्रमुख, महाविद्यालयाचे सर्व अधिष्ठाता, तसेच प्रथम वर्ष विभागात अध्यापन करणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग हे सर्व उपस्थितीत होते. या संपूर्ण कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांचे मोलाचे मागर्दर्शन लाभले. डॉ. नितीन जाधव यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले
फ़ोटो ओळ: पालकांना मार्गदर्शन करताना मान्यवर
Post a Comment