News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

दीपक कुदळे यांना समाज भूषण पुरस्कार

दीपक कुदळे यांना समाज भूषण पुरस्कार



बारामती 
बारामती येथील प्रसिद्ध उद्योजक व श्रीराम अमृततुल्य चे संचालक श्री दीपक कुदळे यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शनिवार ०३ ऑगस्ट रोजी श्री सावतामाळी महाराज पुण्यतिथी महोत्सव समिती कसबा बारामती यांच्यावतीने युवा नेते जय अजित पवार यांच्या हस्ते सदर पुरस्कार देण्यात आला. 

या प्रसंगी मा. नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे,ऍड सुधीर पाटसकर बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव व 
सागर जाधव,शिवाजी जाधव,
संदीप गदादे,सोनु लोणकर,
सागर ओवाळ, प्रशांत बनकर, नितीन शेंडे, सागर आगम, सुयोग गायकवाड,गणेशनाना गायकवाड, तेजस बनकर, स्वप्नील भोसले, सन्नी गदादे,सतीश बनकर आदी मान्यवर उपस्थित होते
प्रतिकूल परिस्थितीत व कठीण परिस्थितीमध्ये व्यवसाय सुरू करून जिद्द चिकाटी आत्मविश्वास या जोरावर व्यावसाय यशस्वी केला अनेकांना रोजगार दिला आणि समाजातील घटकांना वेळोवेळी मदत केली या सर्व कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कार देण्यात आल्याचे संयोजकाच्या वतीने सांगण्यात आले.
सदर पुरस्काराने काम करण्याची उमेद वाढली असून यानंतरच्या काळामध्ये सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने काम करू असे प्रतिपादन सत्कार स्वीकारल्यानंतर दीपक कुदळे यांनी सांगितले.

फोटो ओळ: पुरस्कार स्वीकारताना दीपक कुदळे व उपस्थित मान्यवर

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment