News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

अक्षय घुले यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

अक्षय घुले यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

बारामती: प्रतिनिधी
बारामती शहरातील देसाई इस्टेट येथील अक्षय ज्ञानदेव घुले यांनी पोलीस उप निरिक्षक पदाला गवसणी घालून आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

 अक्षय यांनी सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा
कॉलेज मधून आय. टी .इंजिनिअरिंग ची पदवी घेतली असून त्याने दरम्यान त्यांनी एमपीएससीतून उपनिरीक्षक पदाची तयारी सुरू केली जिद्द ,चिकाटी, आत्मविश्वास या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे.

राज्यात २८ वा येण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.
 एमपीएससी व यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संयम राखणे महत्त्वाचे आहे अनेकदा पेपरच्या तारखा पुढे मागे होत असतात त्यामुळे खचून न जाता संयम राखून मेहनत घेत अभ्यास केला यश नक्की मिळते पोलीस उप निरीक्षक पदी निवड झाल्याचा मनस्वी आनंद होत आहे माझे मनाशी बाळगले स्वप्न पूर्ण झाली अशी भावना अक्षय घुले यांनी व्यक्त केली.


Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment