News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पिंपळी ग्रामपंचायत सरपंच पदी स्वाती ढवाण

पिंपळी ग्रामपंचायत सरपंच पदी स्वाती ढवाण


बारामती: प्रतिनिधी

पिंपळी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी स्वाती अशोकराव चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पिंपळी गावचे विद्यमान सरपंच मंगल हरिभाऊ केसकर यांनी पॅनलच्या बैठकीत ठरविण्यात आलेला कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर सरपंच पदाचा राजीनामा दिला होता.
 त्या रिक्त जागेवर ही निवड करण्यात आली सदर सरपंच पदा साठी झालेला जागेवर पॅनलच्या वतीने स्वाती अशोकराव चव्हाण यांचा सरपंच पदाचा एकमेव अर्ज आला. ही जागा ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. दरम्यान स्वाती ढवाण यांच्या अर्जां शिवाय दुसरा कोणताही अर्ज आला नसल्याने व विहित मुदतीत वेळेत कोणीच अर्ज भरला नसल्याने सदर निवड बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र गिरी यांनी सांगितले .
स्वाती ढवाण या बारामती तालुका जिजाऊ सेवा संघाच्या विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांना जिजाऊ सेवा संघ जिजाऊ महिला बचत गटाच्या माध्यमातून गरजूंसाठी विविध उपक्रम तालुक्यात राबवले दरम्यान या निवडीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रमेश ढवान, छत्रपती कारखान्याचे संतोष ढवाण, खरेदी संघाचे माजी उपाध्यक्ष भाऊसाहेब भिसे, ऍड सचिन वाघ, पोलीस पाटील मोहन बनकर , राष्ट्रवादी सोशल मीडियाचे उपाध्यक्ष सुनील बनसोडे व विविध मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते

फोटो ओळ: स्वाती ढवाण

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment