अंजनगाव मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
बारामती:
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमेश्वर विद्यालय अंजनगाव येथे पोलीस प्रशासनामध्ये भरती झालेले गणेश सुनील अवघडे, आतिश विश्वास लांडगे,प्रतिक विनायक जाधव, तुषार यशवंत इंगळे, यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी अंजनगाव चे माजी सरपंच दिलीप परकाळे ,उपसरपंच नामदेव परकाळे, पोलीस पाटील ईश्वर खोमणे, ग्रामसेविका आशा मुलानी ,सामाजिक कार्यकर्ते मामा वायसे. प्राथमिक आरोग्य केंद्र क-हावागज महेश पारखे , जाणीव प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत मोरे,मुख्याध्यापक गडदरे , महेश पिसाळ, अंगणवाडी सेविका मीरा चव्हाण,शंकर मोटे, आकाश वायसे, सत्यवान कुचेकर , प्रतीक कुचेकर,ओंकार कुचेकर,चंदू कुचेकर तसेच सूत्रसंचालन महेश जमदाडे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रशांत दादा कुचेकर यांनी केले.
फोटो ओळ:
अंजनगाव येथे विद्यार्थ्यांचा सन्मान करताना मान्यवर
Post a Comment