आय बी टी चा सचिन जानराव चे यश
बारामती:
स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत नोव्हेंबर २०२३ मध्ये सर्कल ऑफिसर या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत आय.बी.टी .बारामतीच्या सचिन जानराव ह्या विद्यार्थ्याने यश मिळविले असून त्याची बँकेच्या सर्कल ऑफिसर या पदासाठी निवड झाली आहे.
खाजगी नोकरी, घरातील जबाबदारी व अत्यंत खडतर परिस्थितीत अभ्यास करून त्याने हे यश मिळविले असून आयबीटी बारामतीच्या संचालिका सारिका शहा यांनी त्याचे कौतुक केले आहे.
परीक्षेमध्ये सातत्य ठेवल्यास यश नक्की येते असे सचिन जानराव यांनी सांगितले. लौकिक शहा यांनी आभार मानले
Post a Comment