जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते: श्री आनंदनाथ महाराज
कटफळ मध्ये तुकाईदेवी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण संपन्न
बारामती :प्रतिनिधी
माणसाने जीवनात कितीही प्रगती केली तरी अध्यात्मा शिवाय समाधान व आनंद नाही.जिथे वीज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते असे प्रतिपादन प. पु.सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज सांगवडेकर अध्यक्ष विश्व पंढरी ,कोल्हापूर यांनी केले.
रविवार २८ जुलै रोजी
बारामती तालुक्यातील कटफळ येथे तुकाई देवी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व मंदिराचा कलशारोहण प्रसंगी आनंदनाथ महाराज उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.
या प्रसंगी भारत फोर्ज कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय अग्रवाल,एच. आर. उपाध्यक्ष सदाशिव पाटील, कॉटन किंग कंपनीचे उपाध्यक्ष खंडू गायकवाड,कल्याणी ग्लोबल चे संचालक श्रीनिवास कानडे,श्री विश्ववती आयुर्वेदिय चिकित्सालय कोल्हापुरचे अध्यक्ष श्री निरंजन सांगवडेकर प.पु आक्कासाहेब सांगवडेकर व तुकाई देवी मंदिर चे डॉ संजय मोकाशी, श्री रवींद्र क्षीरसागर, गिरीधर क्षीरसागर,दिलीप झगडे, डॉ विश्वनाथ नरुटे,लक्ष्मण झगडे ,विनायक निकम, डॉ नवीन पाटील आदी मान्यवर उपस्तीत होते.
मानवाने प्रगती करीत असताना संस्कार, संस्कृती ,धर्म व देश याचा विसर पडू देऊ नये अत्याधुनिक युगात विज्ञानाबरोबरच अध्यात्माचे महत्त्वही तेवढेच अधोरेखित आहे .तुकाई देवी मंदिर मुळे परिसर अध्यात्मिक व आनंदी होईल असेही श्री आनंदनाथ महाराज यांनी सांगितले.
कटफळ च्या टेकडीवर एक एकर मध्ये सदर मंदिर उभारले असून संपूर्ण कोरीव दगडी बांधकाम व सर्व परिसर पर्यावरण पूरक आणि विविध वनस्पती व वृक्ष यांचे संगोपन करण्यात आले असल्याचे रवींद्र श्रीरसागर यांनी सांगितले .
कटफळ च्या अध्यात्मिक वैभव मध्ये सदर मंदिर भर घालत असल्याचे विविध मान्यवरांनी मनोगत मध्ये सांगितले.
गणेश पूजन होम हवन गुरुपूजन मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलाशारोहन करण्यात आले व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंदिराच्या उभारणीसाठी योगदान देणाऱ्या कारागिरांचा सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन श्री सावळेपाटील यांनी केले तर आभार डॉ संजय मोकाशी यांनी मानले.
फोटो ओळ.
श्री आनंदनाथ महाराज कोनशीला अनावरण करताना सोबत डॉ संजय मोकाशी, रविंद्र शिरसागर ,दिलीपराव झगडे व इतर मान्यवर
Post a Comment