News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

ज्ञानसागर गुरुकुल सावळमध्ये कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

ज्ञानसागर गुरुकुल सावळमध्ये कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा


बारामती: 
 तालुक्यातील सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुल येथे शुक्रवा २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.
या प्रसंगी बारामती तालुका जय जवान आजी-माजी सैनिक संघटना अध्यक्ष हनुमंत निंबाळकर वीर पत्नी सुनंदाताई नाळे,संस्थेचे अध्यक्ष डॉ. सागर आटोळे,मुख्याध्यापक सुधीर सोनवणे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे,
संस्थेच्या उपाध्यक्षा रेश्मा गावडे, सचिव मानसिंग आटोळे, विश्वस्त पल्लवी सांगळे, दीपक बिबे, सीईओ संपत जायपत्रे, विभाग प्रमुख गोरख वनवे,मेजर बाबुराव चव्हाण, रिनाज मिस, आदी उपस्तीत होते.
एनसीसीच्या छात्र विद्यार्थ्यांनी मेजर चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली शहीद जवानांना दिलेली शस्त्र मानवंदना कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
 हनुमंत निंबाळकर यांनी कारगिल युद्धाचा थरारक प्रसंग वीर जवानांनी लावलेली प्राणाची बाजी लढवत मिळवलेला कारगिल विजय याबाबत माहिती दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीराम सावंत यांनी केली व संस्थेचे पदाधिकारी आणि सर्व एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी हुतात्मा चौक येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.

फोटो ओळ: 
ज्ञानसागर गुरुकुल येथे कारगिल विजय दिवस साजरा करताना विद्यार्थी

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment