बारामती मध्ये कारगिल विजय दिवस साजरा
बारामती: प्रतिनिधी
कारगिल युद्धामध्ये ज्या सैनिकांनी देशासाठी बलिदान केले ते कायमस्वरूपी देशातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरेल व त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे प्रतिपादन बारामती तालुका जय जवान आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर यांनी केले.
बारामती तालुका जय जवान आजी माजी सैनिक संघटना तसेच महिला बचत गट परिवार यांच्या वतीने
२६ जुलै रोजी बारामती शहरातील भिगवण चौक येथील हुतात्मा स्मरकास पुष्पहार अर्पण करून, कारगिल युद्धामधील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी हनुमंत निंबाळकर उपस्तितांना मार्गदर्शन करत होते.
या प्रसंगी तहसीलदार गणेश शिंदे, बारामती नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे ,बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, वीर पत्नी सुनंदाताई नाळे यांच्यासह माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशासाठी सीमेवर लढण्याची संधी प्रत्येक सैनिकास मिळते त्यामुळे तो भाग्यवंत होतो व भारत मातेसाठी बलिदान प्राप्त झाल्यास वीरगती प्राप्त होते,मोक्ष मिळतो ही खरी कमाई असल्याचे हनुमंत निंबाळकर यांनी सांगितले.
या प्रसंगी माजी सैनिक रवींद्र लडकत, नंदकुमार पिसाळ आदींनी मनोगत व्यक्त केले तर
पेन्शील चौक येथुन मोटर सायकल रैली काढून इंदापूर चौक ,गुणवडी चौक गांधी चौक व भिगवण चौकात समारोप करण्यात आला या प्रसंगी भारत माता की जय,शहीद जवान अमर रहे, आदी घोषणा देण्यात आल्या.
सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुलच्या एन .सी. सी . विद्यार्थ्यांनी सलामी दिली तर विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक विद्यालय च्या विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली.
Post a Comment