आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची गर्दी
बारामती:
आषाढी एकादशी निमित्त बारामती शहरातील तांदूळवाडी वेस चौक येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
बुधवार १७ जुलै रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये पहाटे अभिषेक, पाद्य पूजन, त्यानंतर काकडा आरती व भाविकांना दर्शन व खिजडी वाटप या कार्यक्रमाचे विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी जनहित प्रतिष्ठानचे जनहित माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिंडीचे आयोजन केलं होतं यामध्ये विठ्ठल रुक्मिणी व वारकऱ्यांचे वेश परिधान केलेले विद्यार्थी व संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांचे अभंग सादर केले. या प्रसंगी विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष सोमेश कल्याणकर, उपाध्यक्ष प्रशांत खटावकर, सचिव प्रशांत धोकटे, खजिनदार विकास किकले
व मुख्य पुजारी गणेश वनारसे आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
आषाढी एकादशी निमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई व मंदिरामध्ये फुलांची सजावट,रांगोळी गणेश वनारसे व सहकाऱ्यांनी केली होती.शहरातील एकमेव व सर्वात जुने असे विठ्ठल रुक्मिणी मंदिर असून दरवर्षी आषाढी एकादशी व विठ्ठल रुक्मिणी यांचा विवाह सोहळा मंदिरात साजरा केला जात असल्याचे विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.
फोटो ओळ:
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांनी केलेली गर्दी
Post a Comment