इस्कॉन बारामतीचा श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्व संपन्न
बारामती :प्रतिनिधी
"भगवंतांचे प्राकट्य ही केवळ एका युगातील दिव्य घटना नाही, तर प्रत्येक जीवाच्या अंतःकरणाला आशेचा आणि प्रेमाचा प्रकाश देणारा संदेश आहे. भौतिक जगाचा तसेच हृदयातील अनर्थांचा, भार हलका करण्यासाठीही ते आपल्या जीवनात येतात.
हे हृदयपरिवर्तन शक्य होते—कृष्णनाम, कृष्णकथा आणि कृष्णप्रसाद यांच्या माध्यमातून. देवकीच्या गर्भातून प्रकट झालेले तेच श्रीकृष्ण आजही भक्ताच्या हृदयांतरी क्षणोक्षणी प्रकट होऊ शकतात; फक्त त्यांच्याशी प्रेमाचा संबंध प्रस्थापित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन श्रीमान गौरांग प्रभू यांनी केले.
इस्कॉन बारामतीच्या वतीने आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव–२०२६ भक्ती, अध्यात्म, संगीत, संस्कृती ,नाटिका सादरीकरण माध्यमातून संपन्न झाला.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने श्री श्री राधा गोविंद यांची आकर्षक पोशाख, दागिने, विविध फुलांच्या हारांची सजावट, पर्यावरण पूरक हंस आणि कमळांची मनोहारी आरास, १५१ भोग अर्पण, कृष्णाई लॉन्स येथे दीपमाळा आणि कृष्णलीलेचे दर्शन घडविणारे भरगच्च कार्यक्रम यामुळे परिसराला जणू दिव्य स्वरूप प्राप्त झाले होते. श्रीमान अखिल बंधू प्रभू आणि मंडळ यांचे कडून हरिनाम संकीर्तन व मधुर भजन-कीर्तन, श्री श्री राधा-माधव यांचा भव्य कलश अभिषेक सोहळा, मंदिर व्यवस्थापन समिती व्यवस्थापक श्रीमान नंद दुलाल प्रभू आणि सदस्य डॉ. महेश काटे, श्री शरद भोसले, श्री योगेश सुभेदार, ॲड . सुनील पाटील, श्री संजीव देशपांडे यांच्या शुभ हस्ते श्रीमान गौरांग प्रभू यांचे स्वागत, श्रीमान गोरांग प्रभू (बी. टेक. आयआयटी, मुंबई), सभासद, इस्कॉन गव्हर्निंग बॉडी कमिशन यांच्याकडून अमोघ वाणीतील श्रीकृष्णकथा, शुभ हस्ते संकल्पित इस्कॉन बारामती- वास्तू रचनात्मक थ्रीडी दृश्य कल्पना, दृश्यफेरीचे सादरीकरण आणि औपचारिक वर्चुअल उद्घाटन, इस्कॉन मधील विविध उपक्रमांची माहिती, सौ अनुराधा आहेर आणि सौ विद्या पाटील दिग्दर्शित 'विष्णू स्तुती- गरुड गमन नृत्य', "श्री नृसिंह आरती' नृत्य, श्री संजीवनाना देशपांडे दिग्दर्शित मनाचा ठाव घेणाऱ्या 'जेव्हा भगवंत साक्ष देतात' ही साक्षी गोपाल यांच्यावर आधारित भावपूर्ण नाटिकेचे सादरीकरण, श्रीमान नंद दुलाल प्रभुजी यांच्याकडून इस्कॉन वास्तुरचनेची पार्श्वभूमी आणि मार्गदर्शन तसेच श्री श्री राधा गोविंद यांची महाआरती, प्रा. नीलिमा पेंढारकर आणि श्री बाबासाहेब खेडकर यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळ:
श्रीकृष्ण भक्तीचा महिमा सांगताना श्री श्री गोरंग दास व उपस्थित मान्यवर
Post a Comment