अजितदादा जयंती निमित्त वृक्षारोपण संपन्न
बारामती:
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंती दिनानिमित्त नगरसेवक गोरख भाऊ पारसे मित्र परिवाराच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 16 येथे संपन्न झाला (बुधवार २९ जुलै) .
याप्रसंगी बारामती नगर परिषद चे नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ, नगरसेवक विशाल हिंगणे, सोमनाथ गजाकस, गणेश जोजारे, सामाजिक कार्यकर्ते बळवंत विठ्ठल माने, पत्रकार सुरज देवकाते, अमर मोरे, राकेश सावंत, निवृत्ती गोरे, हिरामण माने, बालाजी गुळवे, संतोष जाधव, नारायण ढोबळे, मनोज लालबिगे, व इतर पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते...
अजित दादा यांना अभिप्रेत असलेलं वृक्षारोपण रक्तदान व शालेय पैकी वस्तूंचे विद्यार्थ्यांना वाटप या माध्यमातून जयंती महोत्सव संपन्न करत असल्याचे आयोजक नगरसेवक गोरख पारसे यांनी सांगितले.
फोटो ओळ:
वृक्षारोपण करताना सचिन सातव गोरख पारसे व इतर मान्यवर
Post a Comment