डॉ. विजयकुमार काळे यांना सायकॉलॉजीमध्ये डॉक्टरेट पदवी प्रदान
बारामती: प्रतिनिधी
मथुरा येथील पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठात झालेल्या विशेष समारंभात बारामती येथील मानसोपचार तज्ञ डॉ. विजयकुमार काळे यांना सायकॉलॉजी या क्षेत्रात "डॉक्टरेट" म्हणजेच मानद पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांच्या हिप्नोथेरपी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत विद्यापीठाने त्यांना हा सन्मान दिला आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री , राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठ, चे कुलुगुरु . अरविंद कुमार ,
पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ चे कुलुगुरु डॉ. इंदुभूषण मिश्रा ,
डॉ.रेखा चौहान (शिक्षण संचनालय नवी दिल्ली) यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.
हिप्नॉटिझम व मानसोपचार तज्ञ म्हणून यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांची सेवा करणार असल्याचे डॉ विजयकुमार काळे यांनी सांगितले.
फोटो ओळ: डॉ विजयकुमार काळे यांचा सन्मान करताना मान्यवर
Post a Comment