विदर्भ ॲडव्हांटेज मध्ये सातपुते, जगताप यांचा सन्मान
बारामती:प्रतिनिधी
बारामती एमआयडीसी येथील व्ही आर बॉयलर चे चेअरमन राजाराम सातपुते व यशवंत राया सेक्युरिटी चे चेअरमन प्रवीण जगताप यांचा सन्मान नागपूर येथे आयोजित "विदर्भ ॲडव्हांटेज 2026 मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग
दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते करण्यात आला
ग्रँड एअरपोर्ट बँकेट, मेट्रो स्टेशन, वर्धा रोड, नागपूर येथे आयोजित "विदर्भ ॲडव्हांटेज 2026" या भव्य उद्योग परिषदेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान करण्यात आला
आशीष जयस्वाल (मंत्री, वित्त नियोजन व कृषी), पंकज भोयर (गृहनिर्माण विभाग) अजय संचेती (राज्यसभा खासदार) यांची मान्यवर आदी उपस्तीत होते
उद्योजकांनी स्वनिर्मिती वर भर देऊन देशासाठी विविध उत्पादने बनवावीत व देशी बनावट चा मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे व ग्राहक वर्ग वाढला पाहिजे या साठी प्रयत्न करताना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली पाहिजे याची काळजी घ्यावी असे मार्गदर्शनपर भाषणात नितीन गडकरी यांनी सांगितले.
संरक्षण क्षेत्रासाठी उत्पादन, रोजगार निर्मिती व देशी बनावट साठी व्ही आर बॉयलर व यशवंतराया प्रा ली यांचा सन्मान करण्यात आला.
Post a Comment