News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध: भारत जाधव

कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध: भारत जाधव



सुयश ऑटो सेवकांची पतसंस्था ची सभा संपन्न


बारामती:प्रतिनिधी
कर्मचाऱ्यांचा विकास म्हणजेच संस्थेचा व कंपनीचा असल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वावलंबन करण्यासाठी व विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सुरेश ऑटो सेवकांची सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन भारत जाधव यांनी केले.

सुयश ऑटो सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या सर्वसाधारण २५ वी वार्षिक सभा संपन्न झाली या प्रसंगी व सभासदांना आठ टक्के लाभांश वाटप करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष पोपट घुले सचिव नंदकुमार गवारे प्लांट हेड मनोज इंगळे सुपरवायझर राऊत, सोमनाथ भोंग व संचालक मंडळ ,विद्यार्थी ,सभासद उपस्थित होते.
 अहवालाचे वाचन श्री मनोज इंगळे यांनी केलं 

 संस्थेचे यशस्वी वाटचालीचे आढावा घेऊन तसेच आपली संस्थेचे सभासदांना दहा लाखापर्यंत कर्ज वाटप करण्यात येणार आहे तसेच सभासदांना जर आपतकालीन गरज बसल्या त्यासाठी ८० हजार रुपये तातडीने मंजूर करण्यात येईल व प्रत्येक सभासदाला एक लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण योजना दिली जाईल असे भारत नाना जाधव यांनी सांगितले 
 धर्मेंद्र घोडके, सोमनाथ माने यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिनेश देशमुख यांनी केले आभार प्रदर्शन पोपट घुले यांनी केले तसेच संस्थेच्या वतीने सेवानिवृत्ती कामगार लाला भोंग व सभासद यांची मुले 
समृद्धी हेमंत शिंदे , समीर अनिल गोपने दहावी उत्तीर्ण झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

फोटो ओळ: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना भारत जाधव व इतर

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment