बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या कार्यकारणीवर रोहिदास थोरात यांची नियुक्ती….
बारामती:
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन चा बारामती परिसरातील अग्रगण्य औद्योगिक संस्थेच्या कार्यकारी मंडळामध्ये लोणी देवकर एमआयडीसी मधील उद्योजक रोहिदास थोरात यांचा समावेश करण्यात आलेची माहिती अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिली. बिडा कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सचिव अनंत अवचट, खजिनदार अंबिरशाह शेख वकील, कार्यकारणी सदस्य महादेव गायकवाड, मनोज पोतेकर, खंडोजी गायकवाड, संभाजी माने, हरीश खाडे, विष्णू दाभाडे, हरीश कुंभरकर आणि रोहिदास थोरात उपस्थित होते.
धनंजय जामदार म्हणाले बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून बारामती एमआयडीसी परिसरातील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी व त्यांना शासनाकडून विविध सोईसुविधा मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतात. यापुढे इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर एमआयडीसी मधील उद्योगांचे देखील प्रश्न सोडवण्यासाठी बिडा कडून प्रयत्न करण्यात येतील. हे काम प्रभावीपणे करण्यासाठी रोहिदास थोरात यांचा कार्यकारणीत कार्यकारणीत समावेश करण्यात आला आहे.
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून आपण लोणी देवकर एमआयडीसी मधील उद्योगांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही रोहिदास थोरात यांनी यावेळी दिली.
Post a Comment