News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

प्रा. सागर सर यांना “महाराष्ट्राचे अनमोल रत्न” पुरस्कार

प्रा. सागर सर यांना “महाराष्ट्राचे अनमोल रत्न” पुरस्कार



बारामती : अत्यंत लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनी ABP माझा प्रस्तुत प्रतिष्ठित “महाराष्ट्राचे अनमोल रत्न” पुरस्कार सोहळ्यात बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुलचे संस्थापक प्रा. सागर मानसिंग आटोळे सर यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रा. सागर आटोळे सर यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असून, त्यांच्या शैक्षणिक वाटचालीची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. उदय रविंद्र सामंत आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
ज्ञानसागर गुरुकुलच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, शिस्तबद्ध शिक्षण, संस्कार, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रा. सागर आटोळे सर सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून मिळालेला “महाराष्ट्राचे अनमोल रत्न” पुरस्कार संपूर्ण ज्ञानसागर गुरुकुल परिवारासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या सन्मानामुळे बारामती तालुक्यासह संपूर्ण ग्रामीण शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरातून प्रा. सागर मानसिंग आटोळे सर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment