News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

ज्ञानसागर गुरुकुल मध्ये अग्निशामक प्रशिक्षण संपन्न

ज्ञानसागर गुरुकुल मध्ये अग्निशामक प्रशिक्षण संपन्न


बारामती:प्रतिनिधी
सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुलमध्ये कॅम्प दरम्यान अग्निशमन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला .
राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) 
 व 3 महाराष्ट्र अरमर्ड एनसीसी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने निवासी कॅम्प दि.२५ मे ते ३ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
या कॅम्पदरम्यान एनसीसी कॅडेट्सना विविध विषयांवर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्ञानसागर गुरुकुल येथे कॅडेट्ससाठी अग्निशमन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये आग लागल्यास घ्यावयाची प्राथमिक काळजी, आगीचे प्रकार, अग्निशामक यंत्राचा योग्य वापर, आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित बाहेर पडण्याचे मार्ग, तसेच आपत्ती व्यवस्थापनाची मूलभूत माहिती कॅडेट्सना देण्यात आली.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आग विझविण्याचे तंत्र समजावून सांगण्यात आले. अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे कॅडेट्समध्ये धैर्य, तत्परता, जबाबदारीची जाणीव आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते.
 या कॅम्प चे प्रमुख करणार व्हीएनएस जोहर ( सेना मेडल ) तसेच अंकुश मांढरे व बाबुराव चव्हाण 
 यांच्या मार्गदर्शनाखाली या कॅम्पसाठी निवास, भोजन, प्रशिक्षण व इतर सर्व आवश्यक सुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिस्त, संस्कार आणि राष्ट्रसेवेची भावना जोपासणाऱ्या या कॅम्पमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळत आहे.
पुणे जिल्ह्यातून आलेल्या एनसीसी कॅंडिडेट व प्रशिक्षक आणि अग्निशामक अधिकारी कर्मचारी यांचे स्वागत डॉ. प्रा. सागर आटोळे यांनी केले.
फोटो ओळ: 
अग्निशामक प्रात्यक्षिक दाखवताना अग्निशामक केंद्राचे अधिकारी

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment