मनुष्यबळ विकास कर्मचारी यांच्या एनआयपीएम संस्थेचा वर्धापन दिन साजरा
बारामती:
संपूर्ण देशात अग्रगण्य असलेल्या मनुष्यबळ विकास कर्मचारी यांच्या उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या एनआयपीएम अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनल मॅनेजमेंट संस्थेचा वार्षिक ४६ वा वर्धापन दिन रविवार दि.३१ मार्च रोजी संपन्न झाला.
या प्रसंगी प्रादेशिक कामगार आयुक्त अश्वनीकुमार, प्रादेशिक पीएफ आयुक्त अमित वशिष्ठ , यशस्वी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, एन आय पी एम पुणे विभाग प्रमुख अध्यक्ष डॉ. कल्याण पवार, सचिव डॉ अजित ठाकुर, सहसचिव ॲड प्रशांत क्षीरसागर, उपाध्यक्ष डॉ बाळासाहेब सोनवणे, आणि खजिनदार डॉ संजय झोपे, माझी विभाग प्रमुख डॉ सदाशिव पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
एन आय पी एम राष्ट्रीय पदाधिकारी आणि पुणे विभागाचे पदाधिकारी, पिंपरी चिंचवड आणि सातारा विभागाचे पदाधिकारी आणी मनुषबळ विकास सलग्न मॅनेजमेंट संस्थेचे पदाधिकारी, आजन्म सदस्य उपस्थित होते.
मानव संसाधन विकास क्षेत्रात काम करत असताना नित्य नवीन येणाऱ्या आव्हानाचे कुशलतेने निराकरण करणे आणि त्यासाठी कुटुंबाचे योगदान महत्वाचे आहे वर्षातून एकदा संस्थेच्या सर्व सदस्यांनी कुटुंबासह एकत्रित येणे आणि एकमेकाच्य कौशल्यपूर्ण कार्याचे सामुदायिक पद्धतीने कौतुक करणे अशी गोष्ट आजच्या धावपळीच्या जीवनात फार महत्वाची आहे असल्याचे विचार संस्थेचे पुणे विभाग प्रमुख डॉ कल्याण पवार यांनी सांगितले.
पाच दशकात मनुष्य बळ विभाग आणि एन आय पी एम संस्थेच्या जडण घडण कार्यक्रमात मोलाची जबाबदारी घेणाऱ्या एनआयपीमच्या सदस्य डी बी निंबाळकर, राजू नागेशकर, डॉ. शशिकांत कुर्बेटी , मिलिंद कोलगुड, माणिकराव पाटील, अँड निर्मल, ॲड श्रीनिवास इनामती याचे यावेळी विश्वेश कुलकर्णी यांच्या हस्ते स्मृतिपत्र देऊन विशेष कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला.
पुणे विभागातील सदस्य आणि त्यांचे परिवार यांचे तीस पेक्षा जास्त मान्यवरांचे वेगवेगळ्या विषयात प्राविण्य मिळाल्याबद्दल प्रमुख पाहुण्याच्या हस्ते मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनुष्य बळ विकास प्रमुख करारो समूह सौ. प्राची सोनचल आणि वहिदा पठाण तर आभार प्रदर्शन डॉ.कीर्ती धारवाडकर आणि डॉ सतीश पवार यांनी केले
फोटो ओळ:
मनुष्यबळ विकास कर्मचारी यांच्या एनआयपीएम संस्थेचा वर्धापन दिन प्रसंगी मान्यवर
Post a Comment