जैनकवाडी मध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरा
बारामती: प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील जैनक वाडी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे श्रीराम नवमी निमित्त श्रीराम जन्मोत्सव उत्साह मध्ये साजरा करण्यात आला.
या प्रसंगी
पुणे जिल्हा परिषद सदस्या शुभांगी शिंदे जैनकवाडीच्या सरपंच धनश्री ताई लोखंडे,उद्योजक कचेरजी शिंदे अवधूतजी लोखंडे, प्रकाश लोखंडे, मा. उपसरपंच संतोष लोखंडे,
ह भ प सागर शेंडे, ह भ प संतोष ( बाबा ) लोखंडे, कीर्तनकार सूर्यवंशी महाराज, बांधकाम व्यवसायिक जालिंदरजी शेंडे,कामगार नेते आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभू रामचंद्रांचे विचार आजही प्रेरणादायी व मार्गदर्शक असल्याचे शुभांगी शिंदे यांनी सांगितले.
अध्यात्म आणि विज्ञान या माध्यमातून नवीन पिढी पुढे संस्कार निर्माण करण्यासाठी दरवर्षी श्रीराम जन्मोत्सव साजरा करत असल्याचे सरपंच धनश्री लोखंडे यांनी सांगितले.आभार संतोष बाबा लोखंडे यांनी मानले.
फोटो ओळ:
श्रीराम जन्मोत्सव जैनकवाडी मध्ये साजरा करताना मान्यवर
Post a Comment