News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांवर कार्य करणार : जगन्नाथ वणवे

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांवर कार्य करणार : जगन्नाथ वणवे



वंजारवाडीत रस्त्याचे भूमिपूजन संपन्न
बारामती: प्रतिनिधी 
बुधवार दि. १८ फेब्रुवारी रोजी वंजारीवाडी (ता बारामती) मध्ये जिल्हा परिषद रस्ता ते पालखी महामार्ग रस्ता काँक्रिटी करणे व पालखी महामार्ग ते लक्ष्मी माता मंदिर माळावरील देवी या दोन रस्त्याचे भूमिपूजन श्रीफळ फोडून नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या शुभांगी शिंदे व पंचायत समिती सदस्य अनिकेत गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
 या प्रसंगी सरपंच जगन्नाथ वणवे, ग्रामपंचायत अधिकारी निलेश लवटे,सदस्य सागर दराडे, गोरख चौधर, भारत चौधर, बाबासाहेब ठोकळे, माजी सरपंच दादासाहेब चौधर, रोहिदास नाना चौधर, पारवडी गावचे माजी सरपंच मोहन सांगळे व माजी पोलीस अधिकारी कचेर शिंदे, मयुरेश्वर डेव्हलपर्सचे संचालक शशिकांत चौधर सामाजिक कार्यकर्ते नितीन चौधर , नवनाथ आबा चौधर, पोपट जगताप, रघु चौधर, समीर चौधर, कैलास दराडे, बंडू खोगरे, कॉन्ट्रॅक्टर जावेद शेख, कांबळे, ग्रामपंचायत वंजारवाडीचे कर्मचारी पिंटू सावंत, सुभाष झगडे, सोमनाथ कुंभरकर यावेळी उपस्थित होते.
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारानुसार ग्रामपंचायत नागरिकांसाठी काम करताना गुणवत्ता व दर्जात्मक कार्यावर भर देणार असल्याचे सरपंच जगन्नाथ वणवे यांनी सांगितले.

फोटो ओळ: रस्त्याचे भूमिपूजन करताना सौ शिंदे,गावडे व वंजारवाडी ग्रामपंचायत चे मान्यवर 

--------------------

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment