News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

देहदान ही काळाची गरज: डॉ. अंजली पाटील

देहदान ही काळाची गरज: डॉ. अंजली पाटील



शासकीय महाविद्यालयात देहदान करणाऱ्याच्या वारसास प्रमाणपत्र वाटप 

बारामती:
देहदाना मुळे वैदकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत होते व आध्यात्मिक दृष्ट्या मृत्यू पशच्यात देहाचा उपयोग मानवी कल्याणासाठी होतो त्यामुळे देहदान प्रत्येकाने करावे व ही काळाची गरज आहे असल्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय
 वैदकीय महाविद्यालय च्या 
शरीरशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अंजली पाटील यांनी प्रतिपादन केले.
बुधवार दि.१८ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयात देहदान करणाऱ्याच्या वारसांस प्रमाणपत्र वाटप करण्याच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या या प्रसंगी तंत्रज्ञ किरण घुगे, सोमनाथ भारती, अनिल कोळेकर आदी उपस्तीत होते.
वालचंद नगर चे (इंदापूर तालुका) रहिवासी कै.
श्रीमती विलासनी जयकुमार शहा कै.जयकुमार शहा यांनी जानेवारी मध्ये महाविद्यालयामध्ये देहदान केले होते त्यांच्या इच्छेनुसार सर्व देहदान प्रकिया पार पडल्यावर बुधवार दि.१८ फेब्रुवारी रोजी शहा कुटूंबियाच्या वारसास म्हणजे प्रसन्न शहा यांना देहदान प्रमाणपत्र देण्यात आले.
देहदानाचा प्रचार व प्रसार होणे साठी प्रत्येकाने यात सहभागी व्हावे.बारामती मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयां मध्ये देहदान करण्यासाठी खास कक्ष असून सर्व प्रकारची शासकीय स्तरावर सहकार्य असून कायदेशीर बाबीची पूर्तता करून दिली जाते तरी ज्यांना देहदानाची इच्छा आहे त्यांनी संपर्क साधण्याचे आव्हान करण्यात आले .

फोटो ओळ: प्रसन्न शहा यांना देहदान प्रमाणपत्र देताना डॉ अंजली पाटील व शेजारी किरण घुगे, सोमनाथ भारती आणि अनिल कोळेकर व इतर

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment