News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

महाविस्तार एआय अॅप नोंदणीकरिता शेंडकरवाडी येथे शिबीर संपन्न

महाविस्तार एआय अॅप नोंदणीकरिता शेंडकरवाडी येथे शिबीर संपन्न

महाविस्तार एआय अॅप नोंदणीकरिता शेंडकरवाडी येथे शिबीर संपन्न

बारामती, दि. १६: 
उपविभागीय कृषी अधिकारी, बारामती व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने तालुक्यात ‘महाविस्तार एआय’ अॅप नोंदणी मोहीम अभियान राबविण्यात येत असून शेंडकरवाडी येथे रविवारी दि.१५ विशेष शिबाराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी सचिन हाके, मंडळ कृषी अधिकारी आप्पासाहेब झंजे, उपकृषी अधिकारी प्रविण माने, शेतकरी बांधव उपस्थित होते.

श्री. हाके यांनी ‘महाविस्तार एआय’ अॅप डाउनलोड करण्याची प्रक्रिया, त्याचा प्रभावी वापर व शेतकऱ्यांना होणारे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.या अॅपमूळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होत असून शेतकरी आधुनिक शेतीकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे शेतकरी बांधवानी प्ले स्टोर वर जाऊन Mahvistar AI app यावर क्लिक 'एआय अॅप' डाऊनलोड करुन घ्यावे ,असे आवाहन श्री. हाके यांनी केले.

 बोराटे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना, अॅप बाबत माहिती दिली. श्री. झंजे यांनी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment