News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

महाशिवरात्र निमित्त बारामती मध्ये सिद्धेश्वर चा भव्य महोत्सव

महाशिवरात्र निमित्त बारामती मध्ये सिद्धेश्वर चा भव्य महोत्सव


बारामतीच्या श्री सिद्धेश्वराचा वैभवशाली इतिहास


बारामती: प्रतिनिधी 
 कऱ्हा नदीच्या किनाऱ्यावरील बारामती शहर राजकीय घडामोडींसाठी परिचित असले, तरी या परिसरात अनेक वारसास्थळे आहेत. कऱ्हा च्या उगमस्थानापासून संगमापर्यंत १२ ज्योतिर्लिंग आहेत. त्यापैकी एक असे बारामतीचे ग्रामदैवत सिद्धेश्वर देवस्थान प्रसिद्ध आहे. या मंदिराला ७८६ वर्षे पूर्ण झाली आहेत. 
यादव काळातील हेमाडपंती बांधणीचे अतिशय सुंदर, घडीव आणि अप्रतिम शिल्पकामाने सजवलेले मंदिर आहे. मंदिरामधील नंदी अतिशय देखणा, दगडी कोरीव काम असा आकर्षक आहे.

इतिहासातील उल्लेखांनुसार सिद्धेश्वर मंदिराचे बांधकाम इसवी सन ११४७ मध्ये राजा रामदेवराय यादव यांनी सुरू केले. सन १२३७
मध्ये ते पूर्ण झाले. सुमारे नव्वद वर्षे हे बांधकाम सुरू होते. अखंड लिंग व अखंड दगडात कोरलेला सुंदर नंदी या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. या मंदिराच्या कळसाखाली ध्यानधारणा करण्यासाठी जागा आहे. तिथे एक महादेवाची पिंड होती. मंदिराच्या दुसऱ्या सभामंडपात
कासवाखाली नक्षी करण्यात आली आहे. उत्तम स्थापत्यशैली आणि शिल्पकाम असलेल्या या मंदिराला संत ज्ञानेश्वर माउली, जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज, महाराज शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यापासून कविवर्य मोरोपंत यांच्यापर्यंत
अनेक थोरामोठ्यांनी त्या काळी भेट दिली असून, हे मंदिर बारामतीच्या वैभवशाली वारसा परंपरेचे साक्षीदार आहे.
'शिवकालानंतर पहिले बाजीराव पेशवे यांनी पांडुरंग दाते यांच्याकडे या मंदिराची व्यवस्था सोपविली. तेव्हापासून आजपर्यंत दाते कुटुंब सिद्धेश्वराची दैनंदिन व्यवस्था पाहतात. दाते यांची सध्या बारावी पिढी देवाची सेवा करते. मंदिराच्या इतिहासाबद्दल पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी इसवी सन १७२३ मध्ये मोडी भाषेत एक सनद लिहून ठेवली होती; जी आजही दाते यांच्याकडे आहे. संत ज्ञानेश्वर माउलींनी येथे गणपतीची मूर्ती
स्थापना केली. कविवर्य मोरोपंत व श्रीधरस्वामी यांनी मंदिराच्या आवारात बसून लेखन केले आहे. जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम याच मंदिरात पूर्वी होता' 
दर वर्षी दरवर्षी महाशिवरात्र निमित्त मोठा महोत्सव आयोजित केला जातो व विविध कीर्तनकार यांना या ठिकाणी आमंत्रित केले जाते दर्शनासाठी विविध भागातून भाविक येत असतात

 *चौकट:* 

नंदीच्या अंगावर दगडाने कोरलेली झूल....
अखंड दगडात कोरलेले सालंकृत रूप, आरामदायी बैठक, त्यामध्येच चपळ असा नंदी, हे सिद्धेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य. नंदीच्या अंगावर दगडात कोरलेली झूल आणि घुंगरे आहेत. समोरून नंदीकडे पहिले, तर त्याचा एक कान पाहणाऱ्याकडे आणि दुसरा महादेवांकडे आहे. नंदीचा ओटा हा १२ फूट लांब व १२ फूट रुंद व ओट्याचा जोता हा अडीच फूट उंच आणि तीन कप्प्यांत आहे. नंदीचे मुख्य जोते ४ फूट लांब व ३ फूट रुंद आहे. नंदीची उंची ६ फूट, तर अकरा इंच उंचीचे वशिंड, सव्वा फुट उंचीची शिंगे आणि ११ इंचाचे कान आहेत. नंदीच्या गळ्यात ५ इंचाची घंटी, ५० घुंगरांचा बाजूबंद पट्टा आहे. नंदीची मेघडंबरी १३ लहान दगडी कमानींची असून चार बाजूला हनुमान व नक्षीकाम केलेले खांब आहेत.

चौकट:
सिद्धेश्वर मंदिराला ऐतिहासिक परंपरा आहे. याचे जतन करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करीत आहोत. यात वारसाप्रेमींची साथ मिळाल्याने हा पुरातन ठेवा आजही सुस्थितीत आहे.
कार्तिक स्वामी, दत्त महाराज, हनुमान, विठ्ठल रुक्मिणी, कालभैरवनाथ ,महाकाली,नरसिंह, परशुराम, हनुमान, संतोषीमाता गोंदवलेकर महाराज, संत तुकाराम संत ज्ञानेश्वर आदींची छोटी मंदिरे भाविकांच्या इच्छे खातीर परिसरात बनवली आहे. सिद्धेश्वर मंदिर म्हणजे बारामतीच्या वैभवशाली अध्यात्म च्या इतिहासाचे साक्षीदार होय
- समीर दाते, मुख्य विश्वस्त, 
- श्री सिद्धेश्वर मंदिर, बारामती


फोटो ओळ: 
सिद्धेश्वर मंदिर व समोर च्या बाजूस नंदी व इनसेट मध्ये ग्रामदैवत सिद्धेश्वर

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment