जैनकवाडी येथे महिलांची आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
बारामती: प्रतिनिधी
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत उपकेंद्र निंबोडी अंतर्गत ग्रामपंचायत जैनकवाडी येथे अँनिमीया मुक्त भारत महिलांची आरोग्य तपासणी हिमगलोबिन तपासणी, बी पी, शुगर तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी ग्रामपंचायत जैनकवाडी येथील मा.सरपंच धनश्री लोखंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी एकूण ८५ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामस्थ व सदस्य उपस्थित होते विजय मदने आरोग्य साह्ययक रूपाली बंडगर समुदाय आरोग्य अधिकारी , विकास कापसे आरोग्य सेवक, ललिता सूर्यवंशी आशा व बचत गट, सी आर पी माने स्वयंसेविका इत्यादी उपस्थितीत होत्या.
महिलांनी आरोग्याची काळजी घेऊन शेती,नोकरी , व्यवसाय करावेत परंतु आरोग्य कडे दुर्लक्ष तर कुटूंबाचे आरोग्य बिघडेल त्यामुळे सर्व प्रथम आरोग्य ची काळजी घेण्याचे आव्हान धनश्री लोखंडे यांनी केले.
फोटो ओळ: जैनकवाडी येथे आरोग्य तपासणी प्रसंगी महिला व मान्यवर
Post a Comment