पिंपळी चे रोहित तांबे लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण
बारामती: प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील पिंपळी येथील रोहित आनंदा तांबे महाराष्ट्र लोकसेवा आयोग च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन क्लास वन पदासाठी पात्र झाले आहेत.
खुल्या वर्गातून ६४ वा आणि एन. टी. सी. मध्ये राज्यात ७ वा क्रमांक त्यांनी मिळवला बी. ई. मेकॅनिकल ची पदवी एस.बी.पाटील कॉलेज इंदापूर येथून मिळवली आहे.सामान्य शेतकरी असून सुद्धा जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास च्या जोरावर त्यांनी यश मिळवले असून त्यांच्या यशाबद्दल सेंचुरी वाईन्स प्रा लि चे चेअरमन हनुमंत तांबे व संचालक संदीप तांबे व गोंदिया चे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर व राजपत्रित अधिकारी सुनीता केसकर आदींनी अभिनंदन केले.
फोटो ओळ:
रोहित तांबे यांचा सत्कार करताना केसकर
-------------------------------------
Post a Comment