मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध : अजित पवार
शेकडो मुस्लिम तरुणांचा अजित पवार च्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश
बारामती:प्रतिनिधी
मुस्लिम समाजातील समस्या सोडवण्यात असताना तरुणांना रोजगार,कर्ज,व्यवसाय, नोकरी आदी साठी सहकार्य करू व मुस्लिम समाजाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बुधवार २७ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अल्पसंख्याख मा. अध्यक्ष अस्लम तांबोळी, उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा फिरोज बागवान,चिकन सेंटर असोसिएशनचे अध्यक्ष बुऱ्हा बागवान व फुल अँड फायनल ग्रुप अध्यक्ष मोसिन पठाण इतर दोनशे कार्यकर्त्यांनी प्रतिनिधिक स्वरूपात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला या वेळी अजित पवार बोलत होते.
याप्रसंगी मा.नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, शिक्षण मंडळाचे मा.सदस्य अजीज शेख ,बारामती बँक चेअरमन सचिन सातव आदी मान्यवर उपस्तीत होते.
बारामती शहरातील कब्रस्तान मधील माती बदलणे व इतर सार्वजनिक समस्या सोडवू तसेच बारामती चा विकास होत असताना मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेऊ व विविध राजकीय पदावर कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले
पूर्वी पासून बारामती च्या विकासात मुस्लिम समाज्याचे योगदान असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचार धारेत कार्य करू व बारामती चे नाव उज्जवल करणार असल्याची प्रतिक्रिया अस्लम तांबोळी व फिरोज बागवान यांनी दिली.
सर्व कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करून घेण्यासाठी विशेष परिश्रम करणारे मा शिक्षण मंडळ सदस्य अजीज शेख यांचा सत्कार अजित पवार यांनी केला.
सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले.
फोटो ओळ:
उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना (छायाचित्र: महेश रोकडे)
Post a Comment