ज्ञानसागर गुरुकुलचा खेळाडू शासकीय जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम
ज्ञानसागर गुरुकुलचा खेळाडू शासकीय जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम
बारामती:प्रतिनिधी
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे तसेच खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा २०२५-२०२६ राजगुरू क्रीडा संकुल, खेड तालुका येथे पार पडली.
या स्पर्धेमध्ये ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल, बारामती चा विद्यार्थी सोहेल मुस्ताक खान याने १७ वर्ष वयोगटात, ३८ ते ४१ किलो वजनगटात प्रथम क्रमांक मिळवून विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला तसेच सार्थक सुदर्शन ताकमोगे याने १७ वर्षे वयोगटातील ४८ ते ५१ किलो वजनगटात द्वितीय क्रमांक पटकावून आपली उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.
या कामगिरीबाबत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सागर आटोळे यांनी सार्थकचे विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे. त्यांनी सांगितले की, सार्थकसारखे विद्यार्थी शाळेच्या गुणवत्तेचे प्रतिक असून संस्थेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून ही कामगिरी अत्यंत उल्लेखनीय आहे.
ज्ञानसागर गुरुकुल संस्थेचे संस्थापक, मुख्याध्यापक व संपूर्ण शिक्षकवृंदाने सार्थकचे मनःपूर्वक अभिनंदन केले
फोटो ओळ: सोहेल खान व सार्थक तागमोगे
Post a Comment