अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूल कटफळ येथे वृक्षारोपण
बारामती:प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्या प्रतिष्ठानचे शिक्षण शास्त्र महाविद्यालय विद्यानगरी बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रीन क्लब आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम कटफळ येथील अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज संग्रामनगर कटफळ येथे पार पडला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध्यापक सौ गीता जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सौ संगीता गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व व त्यांचे संवर्धन याची त्यांनी माहिती दिली. पर्यावरण रक्षण याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .यावेळी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. निसर्गाचा करा आदर, भविष्याची होईल कदर. झाडे लावा, झाडे जगवा. असे वेगवेगळे संदेश विद्यार्थ्यांनी यावेळी दिले. शेवटी उपस्थितांनी झाडे लावू, झाडे जगवू अशी प्रतिज्ञा केली.
या प्रसंगी संगीता मोकाशी,नानासाहेब मोकाशी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार सौ सुप्रिया वाघ यांनी केले. वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल प्रशांत वनवे यांनी केले.
फोटो ओळ: अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूल कटफळ येथे वृक्षारोपण प्रसंगी मान्यवर व विद्यार्थी
Post a Comment