ज्ञानसागर गुरुकुलचा ऐतिहासिक विक्रम शासकीय स्केटिंग स्पर्धेत १५ पदकांसह विभागीय स्पर्धेसाठी धडक
बारामती:प्रतिनिधी
क्रीडा क्षेत्रात अपूर्व कामगिरी करत ज्ञानसागर गुरुकुल शाळेने इतिहास घडवला आहे. पुणे जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच झालेल्या शासकीय जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत तब्बल १५ पदके पटकावून ज्ञानसागर गुरुकुलने आपले वर्चस्व सिद्ध केले. या अभूतपूर्व यशामुळे शाळेच्या खेळाडूंची विभागीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यामधे विद्यालयातील श्रेया रणजित गोरे ( 3 सुवर्ण ), वेदिका विजय बारे ( 3 सुवर्ण ), प्रेम लव यादव ( 3 सुवर्ण ), आराध्या अमोल झगडे ( 3 सिल्व्हर ), श्रेया श्रीपती झगडे ( 3 ब्रॉंझ ) अशा पदकांची कमाई केली.
या यशाने संपूर्ण पुणे जिल्ह्यात ज्ञानसागर गुरुकुल ही सर्वाधिक पदके जिंकणारी एकमेव शाळा ठरली आहे. विद्यार्थ्यांच्या जिद्द, मेहनत आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाले आहे.
“ज्ञानसागर गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी घाम गाळून मिळवलेले हे यश म्हणजे शाळेच्या शिस्तीचे आणि क्रीडागुणांच्या विकासाचे फलित आहे. विभागीय स्पर्धेतही आपल्या विद्यार्थ्यांचा झेंडा अधिक उंच फडकेल, असा आम्हाला विश्वास असल्याचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सागर आटोळे यांनी सांगितले
फोटो ओळ:
ज्ञानसागर गुरुकुल चे पदक सहित यशस्वी विद्यार्थी
Post a Comment