लडकत सायन्स अकॅडमी, बारामतीचा एमएचटी-सीईटी मध्ये दैदिप्यमान यश
बारामती: प्रतिनिधी
शैक्षणिक गुणवत्तेचा उत्तुंग आदर्श प्रस्थापित करत, लडकत सायन्स अकॅडमी, बारामती येथील विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
विद्यार्थिनी आदिती वाघमारे हिने ९९.५२ पर्सेंटाइल, अलंकार गोफणे याने ९९.१५ पर्सेंटाइल, हर्षद पवार याने ९८.६१ पर्सेंटाइल, भूमिका आटोळे ९८.२६ पर्सेंटाइल, राधिका परकाळे हिने ९८.१४, हेमंत जाधव आणि शिवम वर्मा यांनी प्रत्येकी ९७ पर्सेंटाइल मिळवले आहेत, विशेष म्हणजे, अकॅडमीचे एकूण २८ विद्यार्थी ९० टक्क्यांहून अधिक पर्सेंटाइल मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत.
या घवघवीत यशामागे संस्थेचे संचालक नामदेव लडकत, गणेश लडकत, मुख्याध्यापक वाघ यांचे मार्गदर्शन, तसेच अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकवर्गाचे योगदान महत्वाचे ठरले आहे.
या यशाबद्दल बोलताना संचालक गणेश लडकत म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व योग्य दिशा देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. आम्ही फक्त गुणांवर भर न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत.
“एमएचटी-सीईटी परीक्षेतील यश म्हणजे इंजिनिअरिंग, फार्मसी, बी.एस्सी. अॅग्रीकल्चर यांसारख्या क्षेत्रात प्रवेशाची सुवर्णसंधी आहे. विद्यार्थ्यांनी योग्य मार्ग निवडून मेहनतीने पुढे जावे आणि आपल्या स्वप्नांना मूर्तरूप द्यावे असे संचालक नामदेव लडकत यांनी सांगितले.
या वेळी पालक व विद्यार्थी यांनी सुद्धा आभार व्यक्त करून योग्य मार्गदर्शन,नियोजन या बदल संस्थेस धन्यवाद दिले.
फोटो ओळ:
अदिती वाघमारे, अलंकार गोफने, हर्षद पवार,भूमिका आटोळे, राधिका परकाळे,हेमंत जाधव
------------
Post a Comment