News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

सभासदांच्या हितासाठी कटिबद्ध: भारत जाधव

सभासदांच्या हितासाठी कटिबद्ध: भारत जाधव



सुयश ऑटो सेवक पतसंस्था सभा संपन्न.१० टक्के लाभांश जाहीर.  

बारामती: प्रतिनिधी 
प्रत्येक सभासदाला दहा लाखापर्यंत कर्ज मर्यादा, आपत्कालीन परिस्थितीमध्ये ५० हजार तातडीची कर्ज योजना, प्रत्येक सभासदाचा विमा उतरवण्यात आलेला आहे व सभासदांच्या पाल्यासाठी सहकार्य , व या आर्थिक वर्षात १०% लाभांश देण्यात येणार आहे व सभासदांच्या हितासाठी नेहमी कटिबद्ध राहू अशी ग्वाही सुयश ऑटो पतसंस्थेचे चेअरमन भारत नाना जाधव यांनी दिली.
सुयश ऑटो सेवकांच्या पतसंस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली यावेळी भारत जाधव उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करत होते या प्रसंगी सुयश ऑटो कंपनीचे प्रकल्प प्रमुख मनोज इंगळे, उपमहाव्यवस्थापक महेंद्र निगडे,वरिष्ठ अभियंता शीरीष राऊत, संस्थेचे उपाध्यक्ष पोपटराव घुले, सचिव नंदकुमार गवारे,संचालक - अण्णा निकम,संजय पवार,राजेंद्र खरात,लाला भोंग,संजय कांबळे,विनोद ठोंबरे,दिनेश देशमुख,धर्मेंद्र घोडके व सर्व सभासद व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सभासदांच्या पाल्यांचा विविध शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यामध्ये हर्षद नितीन जाधव, कृष्णा दिनेश देशमुख आदींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सेवा निवृत्ती बदल राजेंद्र अप्पासो हाके यांचा सन्मान करण्यात आला.
अहवाल वाचन सचिव नंदकुमार गवारे यांनी केले. तर सूत्रसंचालन दिनेश देशमुख यांनी केले. आभार पोपटराव घुले यांनी मानले

फोटो ओळ: 
सेवानिवृत्त कर्मचारी राजेंद्र हाके यांचा सत्कार करताना भारत जाधव, घुले, इंगळे, निगडे व इतर 

-------------------------

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment