News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पंढरपूर सायकल वारी बारामती सायकल क्लबचा सहभाग

पंढरपूर सायकल वारी बारामती सायकल क्लबचा सहभाग

 
बारामती: प्रतिनिधी
 बारामती सायकल क्लब, नाशिक सायकल लिस्ट फाउंडेशन, आणि पंढरपूर सायकल क्लब यांच्या पुढाकाराने घेतलेले आणि लातूर सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या सहकार्याने पंढरपूर नगर प्रदक्षिणा सायकल रिंगण सोहळा आणि संमेलन रविवारी 22 जून रोजी पार पडले.
 सोहळ्याचे हे चौथ वर्ष होते शनिवारी 21 जून ला बारामती सायकल क्लबचे 192 सायकल पट्टू पहाटे पाच वाजता तीन हत्ती चौक येथून मार्गस्थ झाले.
 साडेबारा वाजता पंढरपूर येथे पोहोचले नगरसेवक सनी मुजावर यांनी स्वागत केले पंढरपूर येथील भक्ती निवासात सायकल पट्टू ची निवास व्यवस्था करण्यात आली होती. पंढरीतील या संमेलनासाठी महाराष्ट्रातील ९५ वेगवेगळ्या ठिकाणचे सायकल क्लब फाउंडेशनचे सदस्य सायकलपटू उपस्थित होते सायंकाळी सहा वाजता 4000 हून अधिक सायकल पटवणे पंढरपुरात नगर प्रदक्षिणात सायकल फेरी केली याप्रसंगी केंद्रीय युवा आणि क्रीडामंत्री रक्षा खडसे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, प्रशांत प्रचारक, सनदी अधिकारी पांडुरंग चाटे, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यावेळी उपस्थित होते. सायकलपटूंच्या दोन तीन चार रांगा करत शिस्तने पर्यावरणाचा संदेश देत दत्त मंदिर परिसरात पाच किलोमीटरचे प्रदक्षिणा घालण्यात यावी यावी विठू माऊलीचा गजर करण्यात आला यानंतर रेल्वे मैदानावर सायकल पटूंची एकत्रित येत रिंगण सोहळा पार पडला हरीनामाचा गजर करण्यात आला खडसे यांना सायकलवारी बाबत माहिती देण्यात आली खडसे यांनी सुद्धा याप्रसंगी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील होते यावेळी उमेश परिचारक राजेंद्र वानखेडे एडवोकेट श्रीनिवास वायकर श्रावण उगले डॉक्टर अमित समर्थ आदींची उपस्थिती होती प्रत्येक क्लबच्या अध्यक्षांना विशेष कामगिरी करून सन्मानित करण्यात आले बारामती सायकल पटूंचं आत्तापर्यंत सायकल क्षेत्रासाठी पर्यावरणासाठी कामाची दखल घेऊन ऍड श्रीनिवास वायकर यांचा सन्मान करण्यात आला.
पर्यावरण रक्षण आणि व्यायाम व सायकलच्या माध्यमातून प्रवास यासाठी कटिबद्ध असल्याचे बारामती सायकल क्लब चे ऍड श्रीनिवास वाईकर यांनी सांगितले.


Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment