News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

बारामतीच्या सौ. सोनाली ठवरे यांचा 'योगरत्न पुरस्काराने' सन्मान

बारामतीच्या सौ. सोनाली ठवरे यांचा 'योगरत्न पुरस्काराने' सन्मान



बारामती प्रतिनिधी: 
बारामती येथील सौ. सोनाली राजेंद्र ठवरे या गेली दोन वर्षांपासून नक्षत्र गार्डन, बारामती येथे महिलांसाठी मोफत योगवर्ग नियमितपणे घेत आहेत. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी आयोजित होणाऱ्या या वर्गांचा उद्देश महिलांमध्ये आरोग्याविषयी जागृती निर्माण करणे आणि त्यांचा मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक विकास घडवणे हा आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन 
२२ जून रोजी संभाजीनगर येथे आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन यांनी 
सौ. सोनाली ठवरे यांना 'योगरत्न पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले .
या प्रसंगी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे संस्थापक चेअरमन डॉ. सतीश कराले, व्हा. चेअरमन डॉ. नितीनराजे पाटील, सदस्य डॉ मनोज कुमार, डॉ कृष्णमूर्ती व आयर्नमॅन राजेंद्र ठवरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार आदींच्या माध्यमातून त्या महिलांचे मनोबल वाढवण्याचे कार्य करत आहेत. सोनाली ठवरे या स्वतः अल्ट्रा रनर, हाफ आयर्न वुमन, सायकलीस्ट व ट्रेकर आहेत. त्यांनी "बेटी बचाव बेटी पढाओ" या सामाजिक संदेशासह काश्मीर ते कन्याकुमारी असा ४०७० किमी सायकल प्रवास पूर्ण केला आहे. याशिवाय, त्यांनी अनेक अवघड गड-किल्ल्यांवरही यशस्वी चढाई केली आहे.

महिलांमध्ये ट्रेकिंग व मॅरेथॉन स्पर्धांबाबत आवड निर्माण करण्यासाठी त्या महिलांना रनिंगचे प्रशिक्षण देतात आणि अनेक महिलांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन बक्षिसेही मिळवली आहेत.त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत निस्वार्थपणे योगाचां प्रसार आणि प्रचार करण्याचे मोलाचे कार्य केल्यामुळे आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर यांनी योगरत्न पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले.
या उपक्रमामुळे त्या अनेक महिलांसाठी आरोग्यदूत ठरत आहेत.


फोटो ओळ: मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना सोनाली ठवरे

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment