अजितदादा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हरिनामाच्या गजरात अनुभवला ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा
बारामती :
कटफळ येथील अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सोमवार दि. 30 जून)पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आषाढी एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी मोठ्या भक्ती भावाने पालखी सोहळ्यात सहभागी होतात याप्रमाणे शाळेतील चिमुकले वारकरी देखील या सोहळ्यात सहभागी झाले होते .विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई या संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षण ठरले. या सोहळ्यात दिंड्या, पताका, भजन आणि पारंपरिक वेशभूषा केलेले विद्यार्थी वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. या पालखीसोबत वारकरी दिंड्या, पताका आणि पारंपारिक वाद्याच्या गजरात ज्ञानोबा- तुकाराम असा जयघोष करत डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन हातात टाळ मृदंग घेऊन विठ्ठल नामाचा गजर करत विद्यार्थी वारकरी आपला भक्तिभाव व्यक्त करत होते टाळ मृदंग व विठू नामांनी पालखी मार्ग निनादला.
पालखीचे पूजन संस्थेच्या सचिव संगीता मोकाशी यांनी केले. ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करत पालखी ग्रामदेवता जानाई मंदिरात दाखल झाली. मंदिरामध्ये भजन व अभंग गायन झाले.
ज्ञानोबा माऊली तुकाराम या अभंगाचे गायन करून टाळ व विणा यांच्या तालावर ठेका धरत नृत्य तसेच विठ्ठल फुगडी खेळून प्रत्यक्षात श्री क्षेत्र पंढरपुरातील भक्तीमय वातावरण शाळेच्या क्रीडांगणावर निर्माण केले.
विद्यार्थी व शिक्षकांनी पारंपारिक वारकरी वेशभूषा तुळशी व भगवा ध्वज घेऊन अभंगाच्या ठेक्यावर नृत्य व फुगडी चा आनंद घेऊन या नयनरम्य सोहळ्यात आपली भक्ती अभिव्यक्त केली. या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी पालक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री संग्रामसिंह मोकाशी व श्रद्धा मोकाशी उपस्थित होते. पालखी सोहळ्याचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत वणवे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
फोटो ओळ: वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये अजित दादा स्कूलचे विद्यार्थी
Post a Comment