झैनबिया स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
बारामती: प्रतिनिधी
कटफळ येथील अब्बास मोहम्मद हुसेन एज्युकेशन ट्रस्ट संचालित झैनबिया इंग्लिश मीडियम स्कूल कटफळ मध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. ताहेर तांबेवाला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी संचलन करून ध्वजाला मानवंदना देण्यात आली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी उत्साहाने व उत्स्फूर्तपणे भाषणे केली तसेच मा.ताहेर तांबेवाला यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्कूलमध्ये आलेला अनुभव व्यक्त केले, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी संचलन करीत स्कूलचा निरोप घेतला.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत स्कूलच्या प्राचार्या इन्सिया नासिकवाला यांनी केले व आभार आयशा पठाण यांनी मानले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने पालक वर्ग व स्कूलचे आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ:
झेनेबिया स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करताना मान्यवर
Post a Comment