News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

जिजाऊ सेवा संघाच्या वतीने हळदीकुंकू तिळगुळ समारंभ संपन्न

जिजाऊ सेवा संघाच्या वतीने हळदीकुंकू तिळगुळ समारंभ संपन्न



बारामती: प्रतिनिधी
बारामती तालुका मराठा सेवा संघ प्रणित महिलांसाठी असलेल्या जिजाऊ सेवा संघाच्या वतीने शुक्रवार दि.२४ जानेवारी रोजी जिजाऊ भवन येथे महिलांसाठी संक्रांतीचे औचित्य साधत हळदीकुंकू तिळगुळ वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा स्वाती ढवाण, मराठा सेवा संघाच्या विश्वस्त छाया कदम,माजी नगराध्यक्षा जयश्री सातव व जिजाऊ सेवा संघ च्या उपाध्यक्षा मनीषा शिंदे, कार्याअध्यक्षा सुनंदा जगताप, सहकार्य कार्यध्यक्षा भारती शेळके, सचिव कल्पना माने, सहसचिव ऋतुजा नलवडे, खजिनदार सारिका मोरे, सखजिनदार मनीषा खेडेकर, विना यादव ,वंदना जाधव, उज्वला शेळके संगीता साळुंखे, सुवर्ण केसकर, गौरी सावळे पाटील, पूजा खलाटे, राजश्री परजणे, विद्या निंबाळकर व 
व बारामती शहर व तालुक्यातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
कष्टकरी नोकरदार शेतकरी तसेच गृहणी या महिला भगिनींचे सततचे धावपळीचे जीवन रोजचा ठरलेला दिनक्रम असतो यातून चार क्षण आनंदाचे मिळावेत, महिलांशी हितगुज व्हावे,विचारांची आदान प्रदान व्हावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्षा स्वाती ढवाण यांनी सांगितले.
या कार्यक्रमात सुमारे २००० महिलांनी सहभाग घेतला सर्व महिलांना अल्पोहार तसेच तिळगुळा बरोबर संक्रांतीच्या वाणाचे वाटप करण्यात आले.महालक्ष्मी देवीचे पूजन आरास व सजावट हे खास वैशिष्ट्य ठरले.
आभार उपाध्यक्षा मनीषा शिंदे यांनी मानले 

फोटो ओळ: 
जिजाऊ सेवा संघाच्या तिळगुळ समारंभ प्रसंगी स्वाती ढवाण व इतर सहकारी महिला

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment